कालवश संभाजी भुजंगा दिवडे कोल्हेबोरगावकर यांचे वर्धाप काळाने दुःखद निधन

लोहा| मारताळा वाळकी (बु.) ता.लोहा येथील जेष्ठ नागरिक कालवश संभाजी भुजंगा दिवडे कोल्हेबोरगावकर (वय-९५ वर्षे) यांचे दि. ०८ ऑक्टोबर रोजी रात्री १२: १५ वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कालवश संभाजी भुजंगा दिवडे कोल्हेबोरगावकर यांच्या पार्थिवावर रविवार दि.०८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ०२:०० वाजता वाळकी (बु.) ता.लोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, दोन मुले,सुना,जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. कालवश संभाजी भुजंगा दिवडे कोल्हेबोरगावकर हे अतिशय कष्टाळू आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते.रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा.इरवंत रावसाहेब सुर्यकार यांचे ते आजोबा होत.
भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कष्टकरी नेते कॉ. देवराव आईलवार, गंगाराम दिवडे, सहशिक्षक बालाजी पाटोळे,प्रा. इरवंत सूर्यकार, सेवानिवृत्त मु.अ.भुजंग हरणावळे, दिगंबर हरणावळे, लक्ष्मण हरणावळे, गंगाराम दिवडे, गोविंद जाधव,श्यामराव दर्शने, अजय दिवडे आदी उपस्थित होते
