नवीन नांदेड| मुंबईतील वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट (VJTI) येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एसजीएस नांदेडच्या टेक्सटाईल टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी, हणमंत चलमेवार आणि नक्षन कऱ्हाणे, यांनी तांत्रिक प्रश्नमंजुषामध्ये (तंत्रशास्त्र क्विझ स्पर्धा) द्वितीय परितोषिक मिळवले. त्यांना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते रोख रु.३००० चे परितोषिक मिळाले. तसेच, सिद्धेश्वर मोरताटे आणि तन्वी अस्वले यांचे या स्पर्धेत टेक्सटाईल रिसायकलिंगवरील पोस्टर प्रेझेंटेशनसाठी कौतुक करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे तंत्र शिक्षण मंत्री, मा.पियुष गोयलजी, ह्यांनी या परिषदेस संबोधित केले. एसजीजीएस नांदेडच्या टेक्सटाईल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि परितोषिके मिळवली.विद्यार्थ्यांना त्या सफलतेसाठी संचालक प्रा.डॉ.मनेश कोकरे,टेक्सटाइल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख, प्रा.डॉ.रविंद्र जोशी आणि प्रा.डॉ.प्रकाश खुडे यांचं मार्गदर्शन लाभलं.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ.मनेश ब.कोकरे,विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापकवंद, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.