
उस्माननगर, माणिक भिसे| यंदा कधी नव्हे इतक्या जास्त तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिकांना घरा बाहेर फिरणे मुश्किल झाले होते.वाढत्या तापमानाने जनावरांना चारा – पाणी मिळणे अवघड झाले असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून मृगाच्या पाऊस एकदाच केव्हा पडतो अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.अकाशात ढग भरून येत असल्याने शेतकरी वर्ग खत ,बि.बियाणासाठी खरेदीसाठी कृषी दुकानावर गर्दी होत आहे.
गतवर्षी पिकांना वेळेवर पाऊस पडला नसल्याने कडधान्ये पिके हातून गेली ,तर बाकी पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. वाढत्या महागाईने शेतकरी कर्जबाजारी झाला असून कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन तिव्र उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी शेतीची मशागतीची कामे संपत आली असून. शेतकरी वर्ग एकदाच मोठ्या वाहानात कृषी दुकानातून खत ,बि बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. हवामान खात्याने यंदा भरपूर आणि वेळेवर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी खरिप हंगामाकडे अपेक्षेने पहात आहे. शेतीला लागणारे बि – बियाणे , रासायनिक खते , घेण्यासाठी लागणारी आर्थिक बळ जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे दरवाजे झिजवावे लागत आहे.तर कृषी दुकान मालकाला पिकलेल्या मालावर पैसे देतो या वचनावर खत उचलत आहेत. बाजारात बि बियाणे,खताचे भाव गगनाला भिडले आहेत.
मागील काही वर्षांच्या काळामध्ये राज्यात सर्वत्र कमी प्रमाणात पाऊस झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खत ,बि बियाणे यांचा पुरवठा करण्यात आला आहे. मृग नक्षत्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे विहीर, बोअर यांना पाणी आहे ,अशा शेतकऱ्यांनी हळदीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. शेतातील मशागतीची कामे संपत आली असून उष्ण वातावरणातील उकाडा कमी होण्यासाठी एका मोठ्या पावसाची गरज असून शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा मृगाच्या पावसाकडे लागल्या आहेत…
