नवीन नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे संत सेवालाल महाराज ,संत गुरू रविदास महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त वाचक मेळावा कार्यक्रम मा. शंकरराव देशमुख यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला .
या कार्यक्रमात समाज सेवक प्रा बी. आर.किडे सर व सत्यशोधक प्रबोधनकार व महाराष्ट्र भुषण पुरस्कार,ओबीसी भुषण पुरस्कार मिळालेले प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ.गणपत जिरोनेकर, प्रा.मुरहारी कुंभारगावे, प्रा.अशोक वलेकर, बजरंग तेलंग, केरबा जेटेवाड यांची भाषणे झाली.
प्रमुख वक्ते डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर मार्गदर्शन करताना म्हणाले, महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जिवनात त्यांचे विचार अंगीकारले तरच आपण आपल्या पाल्यांना घडविण्याचे कार्य करू शकतो. माणूस समाजात वाईट गोष्टीकडे आकर्षित होत चालला आहे, त्या साठी आजच्या महिलांनी व पुरूषांनी संतांचे विचार लक्षात घेवून स्वतःच्या व पाल्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे असे प्रतिपादन केले.सत्काराला उत्तर देताना प्रबोधनकार गोविंदराम शूरनर म्हणाले, संत सेवालाल,संत गुरू रविदास,संत गाडगेबाबा बाबा समाज घडविण्यासाठी खुप हालाकिचे जिवन जगावे लागले,लोकांचा त्रास सहन करावा लागला त्या परिस्थितीत ही समाज प्रबोधनाचे कार्य करीतच राहिले , म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजाप्रतिपालक राजे होऊ शकले व रयतेचे राज्य निर्माण केले.
राज्य निर्माण करण्यासाठी अलुतदार, बलुतदार,भटके,दलित ,आदिवासी मराठी मावळे सोबत घेतले म्हणुनच स्वराज्य निर्माण करू शकले.आता काल्पनिक कथेवर अंध्दश्रदा पसरवून मावळ्यात भांडणे लावण्याचे काम स्वार्थी लोकांनी सुरू केले आहे,त्यासाठी आपण कोणत्याहि भुलथापांना व अंध्दश्रध्देला बळी न पडता सावध राहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रताप देशमुख यांनी केले तर आभार ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी मानले.