
नवीन नांदेड। रयतेचे राजे कुळवाडी भूषण ,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक १९फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हडको येथुन मुख्य रस्त्याने मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते, नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबरडे, यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या सह शिवभक्त मंडळ यांच्या सह अन्य शिवजयंती मंडळांनी मिरवणूक काढली.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हडको येथुन भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.
या मिरवणूकीचे उदघाटन आ. मोहनराव हंबरडे,प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने , उदय देशमुख,संजय घोगरे, सिध्दार्थ गायकवाड, सतिश बसवदे, प्रा. मधुकर गायकवाड,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आले. यावेळी लेझीम पथकाने सादरीकरण केले, यात कुसुमताई विघालय सिडको,,इंदिरा गांधी हायस्कूल हडको,प्रियदर्शिनी, कस्तुरबा गांधी शाळेने ऊत्कृष्ट सादरीकरण केले.
ढोलताशांच्या गजरात मुख्य मिरवणूक सिडको हडको मार्गावर काढण्यात आली. यावेळी आमदार हंबरडे यांनी ढोलताशांच्या गजरात ठेका धारला,यावेळी सार्वजनिक जयंती महोत्सव मिरवणूक मध्ये महिलांची, युवती संख्या मोठया संख्येने तर युवक जेष्ठ नागरिक यांच्या सह सामाजिक, राजकीय कार्यकर्ते,लोकप्रतिनीधी, पत्रकार यांच्यी मोठ्या संख्येने सहभाग होते,जयंती मिरवणूक अध्यक्ष दिंगाबर शिंदे यांच्या सह समिती पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यंवराचे स्वागत केले.
हडको व सिडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची शिवजन्मोत्सव निमित्ताने रंगरंगोटी व रोषणाई ,व फुलांची सजावट करण्यात आली होती, शिवजन्मोत्सव निमित्ताने सिडको हडको परिसरातील विविध मार्गावर सामाजिक संघटना, विविध प्रतिष्ठान, यांच्या वतीने अन्नदान वाटप व पाणपोई व्यवस्था करण्यात आले होते.
शिवभक्त मित्र मंडळ सिडको आयोजक निकील देशमुख यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,कांबळे, उपनिरीक्षक महेश कोरे, बाबुराव चव्हाण, जामोदकर,व पोलीस अमलंदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शिवजन्मोत्सव निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको तिन, ग्रामीण भागातील तिन अशा सहा सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आल्या होत्या.
