मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला उस्माननगर परिसरातून जाहीर पाठिंबा
उस्माननगर, माणिक भिसे। मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केल्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाला पाठिंबा म्हणून उस्मान नगर मोठी लाठी तालुका कंधार येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील राष्ट्रीय महामार्ग लगत साखळी व आमरण उपोषणाला 28 ऑक्टोबर शनिवारी पासून उपोषणाला सुरुवात झाली व जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना व नेत्यांना गावात प्रवेश बंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय असल्याचे मराठा बांधवांनी उस्माननगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील मराठा सकाळ बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील काळम यांनी जिल्हाधिकारी व उस्मान नगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनाद्वारे कवीलेखी 28 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या येथील राष्ट्रीय महामार्ग लगत साखळी व आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा सुरू असून या धड्यास पाठिंबा म्हणून येथे सखल मराठा समाज बांधवांच्या वतीने राजकीय पुढारी व नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला असून सदरील बाबतचे निवेदन संबंधित विभागांना दिले आहे.
मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून या लढ्यास पाठिंबा म्हणून उस्माननगर येथील उपोषण करते श्रीराम पाटील काळम व समाज बांधवांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढार्यांना व नेत्यांना गावबंदी करण्यास व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजास शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे. त्यांचा विचार करून समाजास तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली.
त्याचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर गावाचे ग्रामस्थ समाज बांधव साखळी पद्धतीने व आमरण उपोषण सुरू केले आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
श्रीराम काळम पाटील यांची उपोषणाची हॅट्रिक
येथील सामाजिक कार्यकर्ते सर्वांच्या सुखदुःखात धावून येणारे श्रीराम लक्ष्मण काळम यांनी या अगोदर दोन वेळेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे गावाच्या विकासासाठी उपोषणाला बसले होते. आज समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची ही सलग तिसऱ्यांदा उपोषणाची वेळ असल्यामुळे अनेकांचे लक्ष लागले आहे.