हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातून तालुक्यातील मौजे सिरंजनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे तारेवरची कसरत करत बस चालवावी लागत असल्यामुळे मुलींना शालेत ने आन करण्यासाठी दिवसातून चार फेऱ्या मारणाऱ्या मानव विकास मिशनचे बसचालक व विद्यार्थी वैतागले आहेत. हि बाब लक्षात घेता तातडीने रस्त्यावरील सम्पुर्ण गिट्टी उघडी पडून ओबडधोबड झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून रस्त्यावरील टाकलेल्या पाईपला पडलेला खड्डा बुजवून आयटीआय ते सिरंजनी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेज, महाविद्यालय, तसेच खाजगी क्लासेस असे भरपूर शैक्षणिक संस्था आहेत. या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी येजा करतात. या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना ने आन करण्यासाठी शासनाची एसटी महामंडळाचे मानव विकास योजनेची बस चालवित आहे. यामुळे ग्रामदिन भागातील विशेषतः मुलांनी शिक्षण घेणे सोपे झाले आहे. मात्र सिरंजनी रस्त्याच्या कॉर्नवर टाकण्यात आलेल्या पाईपला मोठे भगदाड पडल्यामुळे बस चालविताना अनेकदा टायर फासून वाहन अडकून पडत आहे, तर बसचे टायर देखील भ्रष्ट होऊन शालेय विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आहे.
ठिकाणी ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत विद्यार्थ्यांची प्रवासाची सोय करावी लागत आहे. अशीच तारेवरची कसरत सीरंजणी, एकंबा, कोठा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली असून, दुरावस्थेमुळे एसटी महामंडळाच्या चालक वाहकांना व विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्याने शहराच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन येताना आणि नेऊन सोडताना मोठ्या जिकरीच्या सामना करावा लागत आहे. हिमायतनगर शहरातून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कडून सिरंजनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित होऊन देखील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता या रस्त्यावरील खड्डा मोठा झाला आहे.
त्यामुळे येथून एसटी महामंडळाचे बस अथवा रात्रीला खाजगी दुचाकी घेऊन ये जा करणाऱ्या नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावरील सम्पुर्ण गिट्टी उघडी पडून रस्ता ओबडधोबड झाला आहे. आत्तापर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले असताना देखील या रस्त्याच्या खड्डेमय प्रकाराकडे संबंधित विभाग डोळेझाक करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना हिमायतनगर शहरात शिक्षणासाठी येताना जीव मुठीत धरून यावं लागत आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्त्याची कायमस्वरूपी समस्या सोडवावी. आणि शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाश्याना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी. अशी मागणी शालेय विद्यार्थी व एसटी महामंडळाचे चालक वाहक यांच्याकडून केली जात आहे. यदा कदाचित याठिकाणी एखादा अपघात झाला आणि अनुचित घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी हि संबंधित बांधकाम विभागाची असेल अशा शब्दात प्रतिक्रिया देत विद्यार्थी व पालक वर्गांनी शासनाच्या बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.