
नवीन नांदेड। भावसार समाज सिडको नविन नांदेड, भावसार सेना सेवा समिती नांदेड व युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नविन नांदेड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 24 मार्च 24 रोजी सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वर नगर हडको, नवीन नांदेड येथे अनेक मंदिर परिसरातील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून, केरकचरा जमा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली,यावेळी परिसरातील नागरिक व मान्यवरांच्यी मोठया संख्येने उपस्थिती होती. तर सिडको हडको परिसरासह ईतर अनेक भागातही विधीवत पुजन करून ऊत्साहात साजरी करण्यात आली.
होळीच्या सणाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक होळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हडको भागातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील मुख्य रस्ता लगत असलेल्या झाडे यांच्या पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने परिसराची स्वच्छता करून अभियान राबविण्यात आले.
यावेळी भावसार समाज व पदाधिकारी मोठया प्रमाणात सहभागी होऊन परिसर स्वच्छ केला, व संकलन करण्यात आला, गणेश चव्हाण, पोलिस निरीक्षक सिडको नवीन नांदेड यांचे हस्ते विधीवत पुजन , आरती करून मान्यवराच्या उपस्थितीत होळी दहन करण्यात आले.पर्यावरण होळीचे आयोजन विनोद सुत्रावे ,अध्यक्ष, भावसार समाज सिडको, रामदास पेंडकर तानुरकर, अध्यक्ष भावसार सेना सेवा समिती नांदेड,संजय पेठकर ,अध्यक्ष युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन नांदेड,यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते,
यावेळी परळकर विश्वानंद,संचालक उप वधू वर सूचक जीवन साथी मंडळ सिडको, नवीन नांदेड, पेंडकर शिवराज,संचालक, एस.टी. सहकारी बँक नांदेड,प्रा.दिलीप क्षीरसागर, लक्ष्मण माळवतकर, विजय बिरादार, अनिल राचरलावार ,व्यंकटेश पांचाळ, सतीश पुसदेकर ,खोब्राजी पांचाळ, मांगुसिंग शेखावत,आंनत पेठकर, आनंदराव शिंदे,सतिश सुत्रावे, व्यंकटेश पांचाळ,लक्ष्मण माळवतकर, सुरज गायकवाड,हरिचंद्र राठोड, अशोक हुंडेकर, राजू बर्डे ,अजय राचलावार,सूर्यवंशी देविदास प्रणव सुदेवाड,सौरभ जिंकलवाड, ओंकार भांगे,रोहित गवते, गणेश जिंकलवाड यांच्या सह नागरीक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात रामदास पेंडकर यांनी आपले विचार व्यक्त करते वेळेस हिरण्यकश्यप, होलिका व भक्त प्रल्हाद यांची सविस्तर माहिती, सांगितले. आपापसातील मतभेद विसरून ,एकत्र येऊन मनसोक्त संवाद साधण्याचा दिवस म्हणजेच होळी आहे,आभार प्रदर्शन संजय पेटकर यांनी केले.यावेळी पूनम पांचाळ हिने आकर्षक रांगोळी काढली, पर्यावरण पूरक होळी पाले कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आले.
सिडको हडको परिसरासह विविध भागात मोठ्या उत्साहात होळी सण विधीवत पुजन करून साजरा करण्यात आला, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
