करियरनांदेड

राष्ट्रमाता मां जिजाऊ जयंती निमित्त रेखा बनसोडे यांचा मुंबईत सन्मान

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| विज्ञान-तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाचे राज्य संघटक रेखाताई बनसोडे यांनी कित्येक महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहेत तर अनेक महिलांना कर्ज उपलब्ध करून व्यवसायिक बनविले असल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व काँग्रेस पक्षांच्या महिला अध्यक्षा संध्याताई स्वालाखे यांच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे त्यांना सन्मानित करण्यात आले.

महिलांचे संघटन करून काँग्रेस पक्षांची बळकटी करण्याची काम रेखाताई बनसोडे यांनी विज्ञान-तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाचे राज्य संघटक हा पदभार घेऊन अतिशय दमदार पद्धतीने काम करीत असल्याने त्यांच्या या कार्याला चालना मिळावी या उद्देशाने मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रमाता मां जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महिला अध्यक्षा संध्याताई स्वालाखे यांच्या हस्ते व विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव,सेल विभाग मुख्य समन्वयक प्रज्ञा वाघमारे, काँग्रेस कमिटी विज्ञान-तंत्रज्ञान कौशल्य विभाग नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व्यंकट पाटील हंबर्डे यांच्या उपस्थितीत रेखाताई बनसोडे यांना सन्मानित करण्यात आले असल्याने त्यांच्या चाहत्या वर्गाकडून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!