श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नांदेड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती क्षेत्रात दि. २२/०८/२०२५ रोजी एकूण ९०,०००/- वृक्ष लागवड करणे संबंधी वरिष्ठ कार्यालयच्या निर्देशनुसार नगर पंचायत माहूर साठी 4000 वृक्ष एकाच दिवसात म्हणजे शुक्रवार रोजी लावण्याचे आदेश होते याद आदेशास प्रतिसाद देत नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी मातृ तीर्थ कुंड परिसरातील जंगलाला लागून असलेल्या जागेत दि 22 रोजी चार हजार वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

दि 22/08/2025 रोजी मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरअध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत माहूर शहरातील मातृतीर्थ तलाव या परिसरात मोठ्या प्रमाणात म्हणजेच 1900 वृक्षाचे चे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी न. प. माहूरचे नगरअध्यक्ष फिरोज दोसानी नगरसेवक इरफान सय्यद, विजय कामटकर, शेख अफसरली,सुमित खडसे जेष्ठ पत्रकार विजय आमले इलियास बावाणी स. कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, लेखापाल विशाल मरेवाड का.अ. स्वाती गुव्हाडे, स. प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे, सी एल टी सी विशाल ढोरे, अंबादास मुकटे गोपाल चव्हाण विजय शिंदे, सीसी मजहर शेख, स्वच्छता दूत गणेश जाधव,वैजंता सोनकांबले, ज्योती नलावडे, आशाताई नरवडे, तलवारे, ससाणे, जाधव, रामसिंग थुरवाल, विलास बोरकर, अनिल खडसे सर्व अधिकारी व सफाई कामगार,पत्रकार बंधू, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

