उस्माननगर। येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील बालकलाकारांनी ढोलकीच्या तालावर… घुंगराच्या बोलावर …मी नाचते तालावर..या लावणीवर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने सुंदर असे सादरीकरण केल्याने श्रोत्यांनी टाळ्या वाजवून मनोबल वाढविले .
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ शिराढोण तालुका कंधार संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव माजी सभापती बालाजी माधवराव पाटील पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शिवशंभ कोरे व सहशिक्षक यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने उस्मान नगर येथील शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराढोणगरीचे सरपंच तथा भीमाशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक खुशालराव पांडागळे हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम ,माजी सरपंच श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड , पत्रकार देविदास डांगे , शिवहार स्वामी महाराज मठपती ,दासरे ,अंगुलीकुमार सोनसळे ( ग्रामपंचायत सदस्य ) दत्ता पाटील घोरबांड , माधवराव काळम , त्यांच्यासह पालक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले ,संत गाडगेबाबा, लोकनेते कै.माधवराव पांडागळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
शाळेच्या विद्यार्थिनींनी उपस्थित नागरिक ,पालक ,श्रोत्यांचे स्वागत गीत गाऊन सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रमास सुरुवात झाली. पाचवी ते नववी पर्येतच्या विद्यार्थी विद्यार्थिनीने हिंदी ,मराठी, देशभक्ती गीतावर सुंदर सादरीकरण केले.
यामध्ये भक्तीगीत शिवशंभू ला मंदीरे पूजते , काठीन घोगड घेऊ द्या की रं.., तसेच देशभक्ती , बंजारा गितावर मुलीनी खुप सुंदर असे सादरीकरण केले. शाळेतील बाल कलाकारांना रात्रं दिवस मेहनत घेऊन नृत्याचे मार्गदर्शन शिवसांब कोरे ,जाधव ,जमदाडे ,चिवडे , दौलत पांडांगळे, पठाण ,सौ. डांगे ,सौ. आनमवाड , सौ .शेट्टकर यांनी केले. यांचे कार्याचे कौतुक पालक वर्गातून होत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे शाळेचे सहशिक्षक तथा पत्रकार विठ्ठल चिवडे , भगवान जाधव यांनी सुंदर असे शेरोशायरी तून सुंदर असे सुत्रसंचलन केले. सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पालक श्रोत्यांनी मोठी गर्दी करण्यात आली होती.