श्रीक्षेत्र माहूर, सुरेखा तळनकर। श्रीक्षेत्र माहूर शहरातील अग्रगण्य श्री जगदंबा हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सभागृहात सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चिमुकल्यांचे कलाविष्कार पाहून पालक वर्गसह श्रोते मंत्रमुग्ध झाले.
यावेळी जगदंबा विद्यालयाचे विश्वास्त तथास्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष जय भोपी, ऍड. विजयकुमार भोपी तसेच राजकुमार भोपी यांनी प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे पो नि डॉ.नितीन काशीकर.हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेल्या वेगवेळ्या नृत्यकलांनी वातावरणात जल्लोष निर्माण केला व गावकऱ्यां सह पालकांनाकडुन त्यांना भरभरून प्रतिसाद आणि बक्षीसही देण्यात आली यावेळी अनेक नृत्य, गाणी व नाटक सादर केले, तसेच विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध देशभक्तीपर वेगवेगळी वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंग नाट्यछटाद्वारे सादरकेले.स्नेहसंमेलन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या वतीने क्रीडा स्पर्धा,वादविवाद, स्पर्धा, कला प्रदर्शन वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्कृतीक कार्यक्रमाशी संबंधित मुख्याध्यापक आनंद वानखडे सर , पर्वेक्षक विश्वासराव जाधव निवेदक पर्यवेक्षक विश्वास जाधव यांच्या मिश्किल हास्य,विनोद व शेरोशायरीयुक्त बहारदार व प्रभावी सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना खिळून ठेवले.
मोहम्मद फारुख उर्दू विभाग , सांस्कृतिक विभाग – सौ. कांचन धांडगे, सौ.आम्रपाली शेळके, श्री अमोल टनमने, श्री अविनाश सातव, प्रा.श्रीमंत चौधरी, विजय भेंडे, लक्ष्मण जायेभाये,नारायण शिंदे, गुल खान सर, मोहम्मद गालिब, माझर खान सर.अश्विन भोपी ,व शाळेचे कर्मचारी खंदारे मामा , कामुद मामा , महिला पत्रकार सुरेखा तळनकर , पत्रकार राज ठाकुर, गजानन भारती,राजु दराडे,अपिल बेलखोडे ,तसेच विद्यार्थी व पालक आणि मोठ्या प्रमाणात गावक-यांची या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.