हिमायतनगर। मागील काही काळापासून युवक काँग्रेसचे पद रिक्त झालेले आहे. त्यामुळे युवकांचा नेतृत्व करण्यासाठी कोणीही नसल्याने युवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हि बाब लक्षात घेता आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचे कट्टर समर्थक पंडित अण्णा ढोणे यांनी मी हि जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याची इच्छा दर्शविली आहे. यासाठी माझ्या नावाचा विचार व्हावा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यास न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
शहरातील सर्वांच्या सुख दुख आणि सामाजिक व धार्मिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारा एक सर्व सामान्य कार्यकर्ते म्हणून पंडित ढोणे यांच्याकडे पहिले जाते. परिस्थितीने गरीब असला तरी श्रमदानात सर्वात पुढे राहणार एक काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ते म्हणूंन ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. विशेष म्हणजे हिमायतनगर शहरात वास्तव करणारे असल्याने सर्वांच्या अडीअडचणीला कोणत्याही वेळी ते भेटू शकतात.
गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेस पक्षाचे सक्रियपणे काम करित आहेत. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठीने आणि आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी विचार करून पंडित अण्णा ढोणे यांची नियुक्ती युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करून न्याय द्यावा. अशी मागणी पंडित अण्णा मित्रमंडळ या सोशल मीडिया ग्रुपवर होऊ लागली आहे. मला जर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर संधीचे सोने करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रमानिक प्रयत्न करणार अशी प्रतिक्रीया पंडीत अण्णा यांनी व्यक्त केली.