कृषीनांदेड

उस्माननगर परिसरात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

उस्माननगर, माणिक भिसे| यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केल्याने उस्मान नगर परिसरातील शेतकरी वर्ग कडक उन्हात जीवाची परवा न करता पेरणीपूर्व शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैल जोडीने नांगरणे ,वावरणे , पल्टी मारणे ,कचरा काडी वेचणी , धुरा साळणे , व इतर शेत मशागतीची कामे करण्यात मग्न असून काही शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मृग नक्षत्राच्या पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे.

सध्या आकाशात ढग भरून येत असल्याने वातावरणांत जास्तच उकाडा जाणवत आहे. वाढत्या उन्हाच्या तिव्रतेमुळे सर्वत्र पाणी पातळी खोल गेल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन धोरण राबवून वेळकाढूपणा करीत आहेत. नागरिकासह मुक्या जनावरांनाही पाणीटंचाईचा जबर फटका बसत आहे.शेतकरी राजा बैलांना जीवापाड जपून त्यांचा सांभाळ करतो. त्यांच्याच मदतीने शेतीचे मशागत करतो . त्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी नसल्याने हिरवा चारा नाही ., त्यामुळे कडबा महाग झाला आहे.

बैल , गाय , म्हैस आदी जनावरे बाजारात विकून शेतकरी मोकळा होताना दिसून येत आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणी करूनही पावसाने योग्य वेळी साथ न दिल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यातच खताची कृत्रिम टंचाई व वाढलेल्या किमतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते मागील वर्षी शेतकऱ्यांना उधारी व झालेले कर्ज फेडण्याइतपतही हंगामा न झाल्याने शेतकरी वर्ग परेशान झाला. यावर्षी हवामान खात्याने पाऊस लवकर व भरपूर प्रमाणात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे खरीप पेरणी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे शेतकरी मोठ्या जिद्दीने भूतकाळ विसरून कटू अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन भविष्याच्या लालसेने भावी जीवनाचे स्वप्न उराशी बाळगून पेरणीचे दिवस डोक्यावर आल्याने शेतकरी शेतीच्या कामाला जोमाने लागला आहे.

चिपाडे वेचणे, शेणखत टाकणे व वखरणी करणे , केर कचरा जाळून टाकणे , मातीला पल्टी मारणे , वखरणी करणे , आदीं शेतीची कामे जोमाने सुरू आहेत आकाशात ढग जमा होत आहेत दोन दिवसापूर्वी पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी राजा कुशीत असून , आकाशात ढग जमा होत आहेत. दिवसा तापमानात वाढ होऊन जास्तच उकाडा जाणवत आहे … तीव्र उन्हाच्या उकाड्यामुळे जीव कासावीस होत असतानाही शेतकरी वर्ग शेतात काम करीत आहे. शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ” रोहयो ” ही योजना ग्रामीण भागात संपूर्णपणे मजुराच्या हाताला काम देण्यात अयशस्वी झाले असून मजुराच्या प्रमाणात ज्या गावांना कामे पाहिजे त्या प्रमाणात कामे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजुरांनी कामाच्या शोधात परप्रांतात स्थलांतर केले आहे. त्यामुळे शेतीत काम करण्यासाठी मजूर नाहीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विविध कंपनीचे बी बियाणे बाजारात दाखल झाले आहेत अनेक कंपन्यांनी जाहिरातीवर भर दिल्याने शेतकरी विचारात पडला आहे मेहनत जास्त उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

गतवर्षी डीएपी खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची फारच परेशानी झाली होती. यावर्षी शेतकरी पेरणीपूर्व खदबी बियाणे जमा करण्यात मग्न आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेण्याचे ठरविले असले तरी कृत्रिम खत टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही खरीप पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्याने आपले संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केले आहे यंदा लवकर पावसाळा सुरू होण्याची संकेत आहेत पण पावसाळा केव्हा सुरू होईल यावर सर्व अंदाज अवलंबून आहे. उस्माननगर परिसरात उन्हाळ्याचा शेवट जसा जसा जवळ यायला तसा तसा तापमानाचा पारा वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या नशिबी कधी अतिवृष्टी तर कधी अपुऱ्या पावसामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!