लोहा। नांदेड येथील जिल्हा युवा अधिकारी सौ चंदा रावळकर मॅडम यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत व गावात शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 75 वर्ष पुर्ण झाल्यामुळे आम्रत वर्ष म्हणुन घोषीत करण्यात आले.
त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी ,मेरा देश हा उपक्रम देशभर चालु आहे. कारण आपण प्रत्येक भारतीय नागरिकांना राष्ट्रभक्ती जागृत व्हावी आपल्याला आपल्या मातृभुमीबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करता यावं व आपल्या भारताला 75 वर्ष पुर्ण झाले ज्या ज्या देशाचा रक्षण. करणारे वीर जवान ज्यांनी आपल्या देशासाठी वीरगती प्राप्त केली अशा सर्व सैनिकांना व आज सीमेवर राऊन आपल्या देशाचं रक्षण करणार्या सैनिकांच्या सन्मानार्थ माटी को नमन ,विरो को वंदन या उक्तीप्रमाणे मेरी माटी,मेरा देश हा उपक्रम राबविला जात आहे.
याचं अनूषंगाने नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्या मार्फत सुरज गोविंदराव तेलंगे अध्यक्ष शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून व तालुक्यातील प्रत्येक गावात ,तांडा,वाडी वस्तीत शाळेत, ग्रामपंचायत ,व बचत गटांच्या महिलांकडे जाऊन गावातील माती कलश मध्ये गोळा करून मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत आहेत.