नांदेडमहाराष्ट्र

शिवचरित्रावर आधारित खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन · जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

नांदेड| “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय “महासंस्कृती महोत्सवाचे” आयोजन करण्याचे महाराष्‍ट्र शासनाचे निर्देश आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘ अंतर्गत राज्यातील , विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, नानाविध कलांचे जतन तथा संवर्धन होवून भारताच्या स्वातंत्र्य रणसंग्रामाची माहिती सामान्यजनांपर्यंत, तळागाळात पोहचविण्यासाठी ‘महासंस्कृती महोत्सवातंर्गत जिल्हा प्रशासन नांदेड च्या वतीने शिवचरित्रावर आधारित जिल्हास्तरीय भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगावर नेमून दिलेल्या जागेत रेखीव व सुबक रांगोळी काढणे, असा असणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वय व लिंगभेदाशिवाय या स्पर्धेत भाग घेता येईल. रांगोळी जास्तीतजास्त आकर्षित, रेखीव व सुबक काढणे अपेक्षित आहे. या स्पर्धेचे आयोजन 18 फेब्रुवारी रोजी आयटीआय ग्राऊंड नांदेड येथे सकाळी 10 ते 12 या दोन तासात केल्या जाणार आहे. प्रशासनाने नियुक्त केलेल्या परीक्षकांच्यावतीने अंतिम निकाल घोषित केल्या जाणार आहेत. प्रथम येणाऱ्या तीन रांगोळीस तथा काही रांगोळीस उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार 10 हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय पुरस्कार 5 हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह तथा तृतीय पुरस्कार 3 हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे राहणार आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ काही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

स्पर्धेकरीता लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी सोबत आणणे आवश्यक आहे. सदरील रांगोळी स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे स्पर्धेपूर्वी नोंदणी करणे गरजेची आहेत. नाव नोंदणी करीता सुनील कोमवाड, सुनील मुत्तेपवार व राजेश कुलकर्णी, संजय भालके यांच्याकडे जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूलच्या पाठीमागे, स्काऊट गाईड कार्यालय वजिराबाद नांदेड येथे सकाळी 11 ते 4 यावेळेत 16 फेब्रुवारी 2024 पर्यत करण्यात यावी.

नोंदणीसाठी लागणारे प्रपत्र nanded.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभागी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ सविता बिरगे यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!