क्राईमनांदेड

एक गावठी पिस्टल, 01 जिवंत काडतुस, 01 मॅग्झीन, सह 21000/- रुपयाचा ऐवज जप्त

नांदेड। काल दिनांक 23.03.2024 रोजी सुशिलकुमारं नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड इतवारा यांच्या आदेशाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकं यांना अगामी लोकसभा निवडणुक अनुशगाने रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे फरारी, वॉरंट मधिल आरोपी शोध घेण्यासाठी सुचना दिल्या. उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकचे अंमलदार पेट्रोलिंग करीत ढवळे कॉर्नर येथे पोहचेले असता गुप्त बातमीदार माहिती मिळाली की एक 20 ते 22 वर्षाचा इसम त्याच्या कमरेला गावठी पिस्टल घेऊन अन्सारी हॉस्पिटल समोर सय्यद टी स्टॉल जवळ वसरणी नांदेड येथे थांबलेला आहे

सदर माहीतीच्या अनुषंगाने मा. श्री. सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड, यांनी नमुद इसमास छापा मारुन ताब्यात घेण्याचा सुचाना दिल्या त्याप्रमाणे उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी अन्सारी हॉस्पिटल समोर सय्यद टी स्टॉल जवळ वसरणी नांदेड या ठिकाणी सापळा रचुन संशयित व्यक्तीच्या हलचाली वर लक्ष दिले असता एक 20 ते 22 वर्षाचा इसम सदर ठिकाणी संशयित रित्या मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.

सदर इसमास त्यांचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव गंगाप्रसाद दयानंद महाजन वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मु.पो. तामसा ता. हदगाव जि. नांदेड ह.मु.शंकर नगर वसरणी नांदेड असे सांगितले. पंचासमक्ष सदर इसमास त्याचे अंगझडतीचा उदेश कळवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतुस असे मिळुन आले. त्यास शस्त्र बाळगण्याच्या परवण्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे कळवुन सदर पिस्टल गावठी असल्याचे व ती विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

त्यावरुन पोलीस कॉस्टेबल संतोष बेल्लुरोड यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन दिलेल्या फिर्याद वरुन पो.स्टे नांदेड ग्रामिण येथे. गु.र.न.227/2024 कलम 3/25,7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक मा. श्री. आयलाने यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार कांबळे करीत आहेत. सदर आरोपीस मा. न्यायलयात हजर केले असता आरोपीची मा. न्यायलयाने दि.26/03/2024 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी कडे गावठी पिस्टल राऊंड अनुशगाने तसेच विविध मुदयावर तपास चालु आहे.

सदर कार्यवाही मा.श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. सुशिलकुमार नायक उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यांचे मार्गदर्शना खाली व सुचना प्रमाणे उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकाचे अंलमदार पोलीस नाईक अर्जुन मुंडे, पोलीस कॉस्टेबल चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर विभागाचे पोलीस हवलदार राजु सिटीकर यांनी केली आहे सदरच्या उलेखनीय कामगीरी बाबत वरिष्ठानी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!