धर्म-अध्यात्मनांदेड

एक गाव एक गणपती संकल्पना तालुक्यातील १८ गावात – पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांची माहिती

नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविन्यात आली आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह असून, याचा आदर्श घेवून पुढील वर्षी जास्तीत जास्त गावकर्यांनी लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा. असे आवाहन पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी केले. ते newsflash360.in शी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना बोलत होते.
गणेश चतुर्थी मुहूर्तापासून हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. धार्मिक सन – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास ९१ ठिकाणी गणपती स्थापन केलेल्या मंडळाच्या भेटी घेऊन तसेच पोलीस स्थानकात शांतता कमिटीच्या बैठक घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील हिंदू – मुस्लिम एकतेची परंपरा गेल्या ५३ वर्षांपासून कायम असून, सामाजिक शांतता व बंधुभावाची परंपरा जोपासत सन- उत्सव साजरे केली जातात. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येउन येथे उत्सव साजरे करतात हे भूषणावह आहे.दरवर्षी दुष्काळ परिस्थिती वाढतच आहे, या काळात सन उत्सव सार्वजनिक रित्या आणि एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवून साजरे करने आणि विशेषतः पर्यावरण पुरक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाने डीजे, डॉल्बी सिस्टीम, कर्णकर्कश आवाजावर बंदी घातलेली आहे. केवळ ७५ डिसेबल पर्यंतच्या आवाजाला परवानगी असल्यामुळे मंडळांनी कमी आवाजाचा भोंगा वापरून धार्मिक गीतातून उत्सव साजरा करावा. जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. यामुळे ध्वनीप्रदूषण होऊन दुसर्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अश्या सूचना दिल्या आहेत.

तसेच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून ९१ गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. आमच्याकडे परवान्यासाठी अनेकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी १८ गावात एक गाव एक गणपती तर इतर गावात ४५ अशी एकूण ६३ गणेशाची ग्रामीण भागात स्थापना झाली आहे. तसेच हिमायतनगर सारख्या एकट्या शहरात जवळपास २८ ठिकाणी मुर्त्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अशी माहिती डीएसबीचे अविनाश श्यामसुंदर कुलकर्णी यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव पार पडावा म्हणून पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता दिलीप जाधव, ३८ पोलीस कर्मचारी, २५ होमगार्ड, १० पोलीस व ५ महिला पोलीस नवप्रशिक्षणार्थी, आदी ८२ हून अधिक पोलिसांचे शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचालन (रूट मार्च) करण्यात आले. आत्ता पर्यंत गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून ७ व्या दिवशी ९ गणेश मंडळाचे विसर्जन होत आहे, नवव्या दिवशी १४ आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला उर्वरित गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात‎ “एक गाव एक गणपती” हा उपक्रम‎ मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३३ पोलीस ठाण्याअंतर्गत ६५८ गावांनी एकत्र येत ‘एक गाव‎एक गणपती’ बसविले आहेत. किनवट ‎५०, माहूर ४०, इस्लापूर ३७, मुखेड‎३३, कंधार ३३, सिंदखेड २९, देगलूर ‎२९, कुंटूर २७, उस्माननगर २६,‎ माळाकोळी २५, नायगाव २२,‎ हदगाव, धर्माबाद, रामतीर्थ व लोहा ‎येथे प्रत्येकी २१, अर्धापूर, बिलोली,‎ उमरी प्रत्येकी २०, हिमायतनगर १८, ‎सोनखेड १७, मांडवी १६,‎ कुंडलवाडी, लिंबगाव प्रत्येकी १५,‎ मुक्रमाबाद १३, भोकर, मनाठा‎ प्रत्येकी १२, मरखेल १०, मुदखेड ५, ‎नांदेड ग्रामीण ५, भाग्यनगर व ‎विमानतळ ठाणे अंतर्गत प्रत्येकी एक, ‎तामसा २, अर्धापूर २० अशा एकूण‎ ३३ पोलीस ठाण्या अंतर्गत एक गाव एक गणपती‎स्थापन करण्यात आला आहे.‎

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!