आषाढी एकादशी निमित्ताने ईनरिच प्ले स्कुलची वारकरी पायी दिंडी सोहळा
नविन नांदेड l आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त हे विठुरायाच्या दर्शना साठी पंढरपूरला रवाना झालेअसून विठुराया आणि आषाढीचे महत्व शहरासह ग्रामीण भागतील शाळांमध्ये म्हणजे हाडको येथिल ईनरिच प्ले स्कूल मध्ये येथे १६ जुलै रोजी विठ्ठल- रुक्मीनीच्या वेशभूषेत व इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत ईनरिचप्ले स्कूल वात्सल्य नगर ते हडको येथिल विठ्ठल रुकमिणी मंदीरा कडे पायी दिंडी काढून परिसरातील सर्व महिला नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते .
शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दींडी सोहळा साजरा करण्यात आला, यामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता, सोहळ्याची सुरुवात टाळ मृंदांगाच्या गजरात भजनाने झाली यामध्ये पायी दिंडी मध्ये पालखी सोहळा व विठ्ठल ‘ रुक्मीनीच्या मागे विद्यार्थीनी तुळशीचे वृक्ष डोक्यावर घेऊन तर वारकरी वेशभूषेत विद्यार्थी यांनी टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी पाऊले चालली ,विठुनामाची शाळा भरली यासारखे गीत गायन भजने विद्यार्थी यांनी सादर करीत शाळेपासून पायी दिंडी विठ्ठल रुक्मीणी मंदीर हाडको येथील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात जाऊन विठ्ठलाचे व रुक्मीनीचे दर्शन घेतले यापायी दिंडी मध्ये रस्त्या वरून महिला पुरुषाचे लक्ष वेधून घेतले तर विद्यार्थी यांचे व शाळेतील शिक्षक वृंद यांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्याध्यापिका सौ.राधिका किंगरे शिक्षिका वृंदानी व पालकांनी उस्फृर्तने सहभाग नोंदवला.