नवीन नांदेड। नाही पुस्तक नाही शाळा,हवे ते तेवढे खुशाल खेळा हा एक बालपणातील अविस्मरणीय क्षण पण तो आज काळाच्या ओघात नष्ट झाले आहे म्हणून इंनरिच अप्ले स्कुल व प्रबोध विघामंदिर या शाळेत भातुकली दिवस १४ आक्टोबर रोजी साजरा करण्यात आला या वेळी शाळेतील विद्यार्थी यांनी मनसोक्त खेळाच्या आंनद घेतला.
मुलांनी पुढील जिवनात कसे वागावे निर्णय कसे घ्यावे राजा राणी ने सरवा सोबत कसे आनंदी रहावे हे भातुकली दिवस घेऊन मुलांना शिकवण्यचा प्रयत्न केला, या कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना संचालिका सौ.राधिका कृष्णा किंगरी यांनी भातुकली महत्त्व सांगताना म्हणाले की आज मुलांना मोबाईल आणि व्हिडिओ गेम यांच्या दुष्टचक्रातुन बाहेर काढायचे असेल तर असे पारंपरिक खेळ खेळले पाहिजे.
भातुकली म्हणजे घरातील सामानाची प्रतिकृती पण आज ती आम्ही मुलांसोबत खेळ त नाही म्हणून त्याची जागा मोबाईल गेम आणि व्हिडिओ गेम ने घेतली. त्यामुळे आज मुलांना आम्हाला भातुकली कसी खेळावी हे शिकवावे लागत आहे.एनरिच अप्ले स्कूल व प्रबोध विद्यामंदिर येथे भातुकली खेळ रंगला असता पालकांनी पण बालपणात जाउन या खेळाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी सौ.लक्ष्मी महाजन,सौ.अर्चना केंद्रे,सौ.रोहिणी जहागीरदार, सौ दिपीका वाखरडकर,सौ.सुरेखा कोल्हे, सौ.सुचिता नाईकनवरे सौ प्रचिती कुलकर्णी व सौ.वंदना कांबळे, शांताबाई सोनकांबळे यांनी प्रयत्न केले.