नविन दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन दिव्यांगाना लाभ मिळेणा – समीर पटेल
नांदेड| दरवर्षी 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणुन साजरा केला जातो. व तसेच सर्व सामान्य लोकांमध्ये दिव्यांग विषयी जनजागृती व्हावे. या उद्देशाने हा दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो. गत वर्षी याच 3 डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी महाराष्ट्रात नविन स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील सर्व दिव्यांग बांधवात मोठा आनंद व उत्साह होता. मंत्रालय स्थापन झाल्या नंतर ही आज पर्यंत दिव्यांगाचे पुनर्वसन व कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगाला मिळाला नाही. व तसेच जुन्या दिव्यांग योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे सुध्दा झाली नाही.असे मत आज जागतिक दिव्यांग दिना निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर धरणे आंदोलनात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले.
नविन दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करुन हि शासन स्तरावरून दिव्यांग सर्व योजनेला गती मिळाली नाही. दिव्यांगासाठी स्वतंत्र तरतूद असलेले पाच टक्के दिव्यांग निधी, दिव्यांगाला स्वतंत्र अंत्योदय राशन कार्ड, दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी जागा, दिव्यांग घरकुल योजना, दिव्यांगासाठी रोजगार व नौकरीत संधी मिळाली नाही.संजय गांधी निराधार अनुदानात शासनाने तुटपुंज्या वाढ करण्यात आली. व तसेच बीज भांडवल योजना मध्ये दिव्यांगाला फारसा काही लाभ मिळाला नाही. सर्व दिव्यांग योजनेची जिल्हा व तालुका स्तरावरुन काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही.आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन होऊन एक ही पद भरती प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे दिव्यांगाचा विशेष काही विकास झाला नाही. अशी खंत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या सोबत चंपतराव डाकोरे, राहुल साळवे, जमीर पटेल, कुबेर राठोड, फारुख कुरेशी,अजिंक्य अशोक चव्हाण, अहेमद भाई, गजानन शिंगणे, शेख साजीद, रवी राठोड,सलमा शेख, दिपक सुर्यवंशी, निहार पटेल, सुलताना कुरेशी,शेख नासेर इत्यादीसह शेकडो दिव्यांग यावेळी उपस्थित होते.