उमरखेड, अरविंद ओझलवार। मागील आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व घड्याळ चिन्ह अधिकृतरित्या अजित पवार गटाला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)गटाची काल उमरखेड येथे तालुका आढावा बैठक पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले नवीन तुतारी चिन्ह चा जयघोष करून तुतारी चीन्हाचे अनावरण करण्यात आले तसेच तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विस्तार करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले..
पक्ष अडचणीत आहे मात्र तन-मन-धनाने पुन्हा एकदा मेहनत करून पक्षाला उभारी देण्याचे काम तळागाळातील कार्यकर्त्यांनी करायला हवे असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला, तसेच पवार साहेबांना ताकद देण्यासाठी आपण एकजुटीने महाविकास आघाडीमध्ये लढा दिला पाहिजे व येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असेल तरी तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार समजून आपण येणाऱ्या काळात मेहनत करून महाविकास आघाडीची देशावर आणि राज्यात सत्ता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे यावेळी प्रतिपादन करण्यात आले..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे तालुका कार्यकारिणी गठित करून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला व तालुक्यातील अनेक सक्रिय व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना कार्यकारणी मध्ये स्थान देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील कनवाळे यांच्या मान्यतेने नियुक्तीपत्र देण्यात आले.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तालुका उपाध्यक्ष म्हणून संजय देवसरकर, शेख इसराइल, प्रकाश जाधव ,इब्राहिम अली नवाब ,यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका सरचिटणीस म्हणून बालाजीराव डाखोरे, अशोकराव शिंदे सर ,प्रभाकरराव भीमेवार यांची नियुक्ती करण्यात आली, तालुका कोषाध्यक्ष म्हणून विठ्ठल हिरामण हनवते साहेब यांची तर तालुका सचिव म्हणून सुभाषराव गंगाराम जाधव यांची तर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी भाग्यश्री शिंदे नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष साजिदभाई जहागीरदार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नलिनी ठाकरे जिल्हा पदाधिकारी भावनाताई लेडे कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेश्राम साहेब ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भास्करराव पंडागळे साहेब जेष्ठ नेते राजूभैया जयस्वाल खविस संचालक तानाजीराव चंद्रवशी यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.