नांदेडसोशल वर्क

नांदेड डाक विभागात राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन

नांदेड। युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) च्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त डाक विभाग दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो. ज्याची सुरुवात जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबर पासून होते. यंदाच्या जागतिक टपाल दिनाची संकल्पना “टुगेदर फॉर ट्रस्ट” आहे.

या वर्षाच्या टपाल सप्ताहामध्ये 9 ते 13 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत  नांदेड डाक  विभाग पुढील उपक्रम राबविणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या कालावधीत आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाला भेट देऊन डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक आर. व्ही. पाळेकर यांनी केले आहे.

जागतिक टपाल दिन

सोमवार 9 ऑक्टोंबर 2023 रोजी जागतिक टपाल दिनानिमित्त नांदेड विभागात सर्व कार्यालयात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.

वित्तीय सशक्तीकरण दिवस

मंगळवार 10 ऑक्टोंबर 2023 रोजी नांदेड डाक विभागातील सर्व-कार्यालयांमध्ये विविध प्रकारची नवीन खाती उघडण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

फिलाटेली डे

बुधवार 11 ऑक्टोंबर 2023 रोजी लिटल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव जिल्हा नांदेड आणि नवोदय विद्यालय शंकरनगर येथे प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रह (फिलाटेली) हा विषय एक छंद म्हणून जोपासला जावा यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मेल आणि पार्सल डे

गुरूवार 12 ऑक्टोबर 2023 रोजी मेल्स आणि पार्सल्सच्या वाटपाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे डाक विभागाच्या प्रमुख ग्राहकांसोबत ग्राहक मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे.

अंत्योदय दिवस

शुक्रवार 13 ऑक्टोंबर 2023 रोजी समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत डाक विभागाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी जसे की थेट लाभ हस्तांतरण (DBT), सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन, जन सुरक्षा योजना (PMJJY, PMSBY, APY) सुकन्या समृद्धी खाती, AePS, आधार कार्ड काढण्याची विशेष मोहीम आणि इतर योजनांच्या उपलब्धते बद्दल सर्व पोस्ट ऑफिसमध्ये मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. डाक विभागाची उत्पादने आणि सेवा, डिजिटल पेमेंट करताना सुरक्षा उपायाचा अवलंब करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता मोहीम देखील या ठिकाणी राबवली जाणार आहे, अशी माहिती  नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक आर. व्ही. पाळेकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!