श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| रुग्णांसह नागरिकांना आर्थिक मानसिक फटका अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून निवेदने देण्यात आली शासनाकडून समायोजन करण्याची आश्वासनही देण्यात आले परंतु त्यांचे शासकीय सेवेत समायोजन झाले नसल्याने त्यांनी दि 19 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम सोबतच नागरिकांना आर्थिक मानसिक फटका बसत असल्याने शासनाने त्यांची मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदावर काम करत कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती दि. १४/०३/२०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेशन करणेसाठी शासननिर्णय निर्गमित झाला. सव्वा वर्षे कालावधी होवूनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच मानधनवाढ, लॉयल्टी बोनस ईपीएफ इन्शुरन्स बदली धोरण मान्य होत नसलेने तसेचआरोग्य मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दि. ०८ व १० जुलै २०२५ रोजी संघटना शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने मंगळवार दि. १९/०८/२०२५ पासून बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे.

.तरी या कालावधी मध्ये माहूर तालुका अंतर्गत लसिकरण सत्र, विविध अहवाल तसेच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपाची सर्व कामे बंद करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तालुका आरोग्य अधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनावर. वट्टमवार एन.जी. राठोड आय. यू झाडे डि, एम, एम. पी. सलाम. यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

