नांदेड। कोजागिरी पौर्णिमा व दिपावली पुर्व स्वर मेघ तर्फे हॉटेल विसावा पॅलेस येथे ” मेरी आवाज ही पहचान है ” संगीत मैफल चांगलीच बहरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट चा सामना सुरु असुनही संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सादर केलेल्या सुपर हिट गीतांनी रसिक भुतकाळात रममाण झाले. सुप्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांची निर्मिती असलेल्या स्वर मेघ या फिल्मी गीतांच्या कार्यक्रमाला जेष्ठ गायक मंजूर हाश्मी यांच्या संकल्पना लाभली तर संगीतप्रेमी ईंजि संजीवन गायकवाड यांनी निर्मिती सहाय्य म्हणून आपली यशस्वी जबाबदारी पार पाडली. प्रमुख अतिथी म्हणून डॉ राजेंद्र गोणारकर, डॉ चित्रा पाटील, ॲड चिरंजीलाल दागडीया यांची उपस्थिती होती.
प्रारंभी सरस्वती पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या गायिका मेघा संजीवन यांनी तब्बल बारा युगल गीतांना संगत करत सोलो गीतांचे सादरीकरण करत कार्यक्रमाला चार चॉंद लावले.प्यासा सावन चित्रपटातील मेघा रे मेघा रे हे गीत संजय जगदंबे यांच्या साथीने तर कार्यक्रमाचे शिर्षक गीत नाम गुम जायेंगा चेहरा ये बदल जायेगा हे गीत उदयसिंह बिसेन यांचें साथीने गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन ॲड गजानन पिंपरखेडे व स्मिता मोहरीर यांनी केले.
दरम्यान जिया लागेना तेरे बिना या सोलो रचना मेघा संजीवन यांनी सादर करुन रसिकांची मने जिंकली. रफी सिंगर मंजूर हाश्मी यांनी गायलेल्या ये चॉंद सा रोशन चेहरा या गीताला रसिकांची प्रचंड दाद मिळाली.डॉ सिध्दार्थ जोंधळे यांनी सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं तर डॉ हंसराज वैद्य यांनी आधा है चंद्रमा रात आधी या युगल रचनेतून आपला सहभाग अधोरेखित केला.डॉ राजेश पतंगे यांनी ओ मेरे दिल के चैन हि रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
विषेश करून डॉ हंसराज वैद्य लिखित आई तुझ्या कृपेने व आई माझे घर या मराठी रचना मेघा संजीवन यांनी सादर करुन मराठमोळा माहोल तयार केला.शेवटी रात के हमसफर थक के घर को चले गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.