हदगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणारा नांदेड- वर्धा रेल्वे प्रकल्प पी.एम. च्या पोर्टलवर घ्यावे -जनतेची मागणी
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नांदेड – वर्धा हा रेल्वे प्रकल्प पीएम पोर्टल वर घेण्यात यावा. अशी मागणी होत असून याबाबत नांदेड जिल्ह्यातील विद्यमान आमदार व खासदार यांनी मागणी करावी असे हदगाव तालुक्यातील जनतेचे मत आहे.
या अर्थसंकल्पात प्रकल्पला 750 कोटीची तरतूद झालेली असून, या मार्गासाठी निधीची तरतूद झाल्याने या प्रकल्पला निश्चितच गती मिळणार आहे. विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी वर्धा ते कळब 45 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. कळब ते यवतमाळ लोहमार्ग प्रगतीपथावर असून, लवकरच ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्राकडून सांगण्यात आली. परंतु यवतमाळ ते नांदेड या कामासाठी प्राप्त निधी मिळावा या करिता विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर व खा. हेमंत पाटील सह मराठवाड्यातील आमदार खासदारांनी याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तसेच रेल्वेच्या कामाला गती मिळावी यासाठी यांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. या रेल्वे प्रकल्पला 40 टक्के वाटा राज्य शासनाचा असून, 60 टक्के वाटा केंद्र शासनाचा विदर्भातील लोकप्रतिनिधींनी जसे शर्तीचे प्रयत्न करून त्या भागात वर्धा- नांदेड रेल्वे प्रकल्पचे काम जोरात सुरू केले आहे. पण ह्या प्रकल्पच्या कामाला नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही अशी माहिती आहे. शेत जमिनी रेल्वे खात्याकडूनअधिग्रहण करण्यात आल्या. या रेल्वे प्रकल्पाचे हदगाव तालुक्यात काम केव्हा सुरू होणार याकडे येथील जनतेचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या अंतिम अर्थसंकल्पात वर्धा यवतमाळ नांदेड या 275 किमी रेल्वे मार्गासाठी 750 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
आमदार -खासदारांन एकत्र येणे गरजेचे….!
या नांदेड वर्धा नवीन रेल्वे प्रकल्पाला 11 फेब्रुवारी 2009 रोजी तात्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते यवतमाळ येथे सुरुवात झाली होती. नांदेड यवतमाळ वर्धा या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या रेल्वे मार्गावर 80 मोठे 50 माध्यम 43 रेल्वे उडान पूल आहेत. 27 रेल्वे स्टेशनच्या इमारती तर 52 अंडर ब्रिज आहेत. आठ किलोमीटरचे 6 बोगदे बांधले जाणार आहेत. 14 वर्षांपूर्वी 274 कोटी 55 लाख किंमत असलेला हा प्रकल्प साडेतीन हजार कोटीवर पोहोचला आहे. विदर्भात हे प्रकल्पाचे काम जोरात आहे. मात्र हादगाव तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या रेल्वे प्रकल्पाकरिता विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे असून, खा. हेमंत पाटील हे शिवसेनेचे ( शिंदे गटाचे) आहे. यांनी या मार्गातील विविध स्तरावर आलेले अडथळे दूर करणेसाठी केंद्र शासन व राज्य शासनाला आपला निधीचा वाटा देण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. तरच हदगाव तालुक्याच्या विकासाला गती येईल आणि त्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे.