नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २४ मंगळवारी सकाळी 06.00 वाजता नांदेड तहसील कार्यालयच्या महसूल पथकाने असर्जन येथील गोदावरी नदीपत्रात अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कार्यवाही केली (Nanded Tehsil takes action in illegal sand mining case) आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंगळवारी नांदेड तहसीलच्या महसूल पथकाने असर्जन येथील गोदावरी नदीपत्रात गस्त केली. यावेळी दोन वाळू उपसा करणारे इंजिन व पाच तराफे आढळून आले. पथकाने पाच तराफे, दोन इंजिन जाळून नष्ट केले आहेत. सदर कारवाई मध्ये १० लक्ष रुपयाची इंजिन व तराफे जाळून नष्ट करण्यात आले आहेत. सदर कारवाईच्या वेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे एसआय गवळी हे उपस्थित होते.

या कार्यवाहीमध्ये महसुलाचे नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे , दिलीप पवार, माधव पाटील, मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे, कुणाल जगताप तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिव तेलंगे यांचा समावेश होता. कार्यवाहीत नष्ट करण्यात आलेल्या वाळू उपसा करणाऱ्या इंजिन मालकांबाबत माहिती मिळू शकली नाही. मालकाचा शोध लागताच याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगणायत आले आहे.
