नांदेड| नांदेड शहरातील मटका जुगार चालक कमल यादव याला सहा महिण्यासाठी हद्दपार करण्यात आले असून, त्यास जिल्हा जालना येथे जिल्हयाबाहेर सोडण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी जारी केलेल्या प्रेसनोटमधून दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, इतवारा अति. पदभार उपविभाग नांदेड शहर, यांनी जिल्हयातील अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाया करण्याच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वजीराबाद हद्दीतील अनेक गुन्हेगारांविरुध्द पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाने कार्यवाही केली होती.
पोलीस ठाणे अभिलेखावरील मटका जुगार चालक कमलकिशोर गणेशलाल यादव, रा. दिलीपसिंघ कॉलनी नांदेड यांचेविरुध्द मटका जुगार व शरीराविरुध्दचे एकुण (39) गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख आढळुन आल्याने त्यांचेविरुध्द नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या चार जिल्हयातुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव मा. उप विभागीय दंडाधिकारी, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला होता.
सदरचे प्रकरण मा. श्री. विकास माने, उप विभागीय दंडाधिकारी, नांदेड यांचेकडे चालविण्यात आले. प्रकरणात त्याचे कार्यालयीन आदेश क्र. 2023/हद्दपार/एमजी/सिआर-3/जा.क्र.161 उप विभागीय दंडाधिकारी, कार्यालय, नांदेड दिनांक 01.01.2024 अन्वये कमलकिशोर गणेशलाल यादव उर्फ बटावाले रा. दिलीपसिंघ कॉलनी याचे विरुध्दचा हद्दपारीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला असुन त्यास सहा महिण्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यास तीन दिवसाचे आत नांदेड जिल्हा सोडुन जाणे बाबत व नादेड जिल्हयाच्या परीसरात सहा महिण्यापर्यंत प्रवेश करु नये असे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
सदर आदेशाप्रमाणे अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय मंठाळे, शिवराज जमदडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/329 मेघराज पुरी यांनी सदरचे आदेश कमलकिशोर गणेशलाल यादव यास तामील केले. आदेशाप्रमाणे कलमकिशोर गणेशलाल यादव यास नांदेड जिल्हयातुन जालना जिल्हयामध्ये सोडुन हद्दपारीचे आदेश पारीत केले आहेत.
नांदेड शहरातील जनतेस आवाहण करण्यात येते की, सदरचा हद्दपार करण्यात आलेला ईसम हा नांदेड शहर व नांदेड जिल्हयात आढळुन आल्यास त्याबाबतची माहीती खालील नमुद संपर्क क्रमांकावर कळविणेस विनंती आहे. 01. पो.स्टे. वजिराबाद कार्यालय नंबर – 02462-2236500, 02. मा. पोलीस निरीक्षक, अशोक घोरबांड -9823333377 , 03. मा. सहा. पोलीस निरीक्षक, शिवराज जी. जमदडे, -9890396652, 04. पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 वर संपर्क करावा. उर्वरीत प्रलंबीत प्रस्तावातील जास्तीत जास्त गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कार्यवाही पोलीस विभागाकडुन करण्यात येत आहेत. असे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांनी कळविले आहे.