नांदेड| माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजिनाम्याची बातमी पाहिली. गेली कित्येक वर्षे नांदेडमध्ये आम्ही भाजपची विचाराधारा पुढे नेण्याचे काम केले आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख कारभाराला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे आणि भाजपा देशातीलच नव्हे तर जगातील मोठा पक्ष म्हणून नावारूपास येत आहे.
अशा वेळी सर्वांना भाजप सोबत काम करून देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहभागी व्हायचे आहे. यालाच अनुसरून जर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब भाजप मध्ये येत असतील तर त्याचे मी स्वागत करेन अशी प्रतिक्रिया भाजपचे विधासनभा सदस्य आ.राम पाटील रातोळीकर यांनी दिली.