हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवरील शेडसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे खोदून जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र या शेडचे बांधकाम कंत्राटदाराणे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे ट्रेन पकडण्यासाठी जाण्याच्या गोंधळात एखाद्या प्रवाशासोबत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही झाल्यास रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार राहील अश्या संतापजनक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

हिमायतनगर शहर रेल्वे स्थानकाला गेल्या अनेक वर्षांपासून असुविधांनी वेढले आहे, या स्थानकासाठी प्रसाधनगृह, पोलीस चौकी, पिण्याच्या पाण्यासह अनेक गाड्या सुरू करण्याची विनंती करूनही वरिष्ठांकडून प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणार्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिमायतनगर शहर स्थानकात इलेक्ट्रॉनिक रेल्वे लाईटचे कामही पूर्ण झाले असून, तसेच प्लॅटफॉर्मवरील शेडसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे खोदून जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र या बांधकामाचे कंत्राटदार काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करत आहे.

यामुळे ट्रेन पकडण्यासाठी जाण्याच्या गोंधळात एखाद्या प्रवाशासोबत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरातील अनेक नागरिक सकाळी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जॉगिंगसाठी येतात, यादरम्यान अंधारात अनेकजण खड्ड्यात पडले असून, काहींना किरकोळ मार लागला आहे. एखादा मोठी दुर्घटना झाल्यानंतर ठेकेदार शेडचे बांधकाम पूर्ण करणार आहे का..? असा प्रश्नही आता प्रवाशी व नागरीकातून उपस्थित केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे अन्यथा याविरोधात प्रवाशी नागरिकांना आंदोलन करावे लागेल असा इशारा अनेक प्रवाश्यांची दिला आहे.

हिमायतनगर शहर तेलंगणा हे विदर्भाच्या सीमेवर वसलेले असून, हिमायतनगर रेल्वे स्थानक दोन प्रांतांच्या मध्ये आहे. येथील व्यापारपेठ मोठी आहे आणि दोन्ही प्रांतातील लोक येथे खरेदी – विक्रीसाठी येतात. तसेच येथील व्यापारी माल खरेदीसाठी मोठ्या शहराकडे जातात. आणि अनेकजण हिमायतनगर रेल्वे स्थानकातुन दूरवरून ये-जा करतात. या स्थानकावर महिला -पुरुष प्रवाशांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्थानकात बसण्याची व्यवस्था नाही. यासह विविध समस्या भेडसावत आहे…? तसेच एकाच वेळी दोन रेल्वे आल्यास नागरिक व्यापाऱ्यांना या थांब्यावरून दुसऱ्या थांब्याच्या प्लॅटफॉर्मवर ये-जा करावी लागते.
मात्र हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर शेड बांधण्यासाठी मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले असून, हे बांधकाम पूर्ण करण्याऐवजी कंत्राटदार गेल्या दोन महिन्यांपासून खड्डे खोदून जैसे थेच ठेवले आहे. यामुळे प्रवाशी व नागरिकांना अडचणींचा सामना करत आहेत. एका क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी जाणे प्रवाशांसाठी धोक्याचे बनले आहे. नांदेड विभाग रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी ही परिस्थिती डोळ्यांनी पाहावी. आणि रखडलेल्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाईबाबत व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रवाशी नागरिक या विरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
