नांदेड,अनिल मादसवार| मागील अनेक वर्षांपासून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई संदर्भाचा प्रश्न अधांतरी आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान होऊनही योग्य भरपाई मिळत नाही, विमा कंपन्यांकडून नुकसान भारपीमध्ये भेदभाव केला जात आहे. यासह इतर सर्व अडचणीच्या संदर्भाने नुकतीच मुंबई येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनातं पीक विमा भरपाई संदर्भात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकर्त्यांचं जिव्हाळीच्या प्रशांबाबत आमदार महोदय अग्रेसिव्ह असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आगामी काळाततरी पिकविमा नुकसानीप्रमाणे भेटलं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हाफगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा, पंचनामे व अनुदान वाटपाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०३ जुन रोजी विशेष बैठक पार पडली. या बैठकीतील 2024 सालातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून अद्यापपर्यंत विमा भरपाई दिला नाही.

शेतकऱ्यांनी तक्रार केली की, कंपनीने इतर तालुक्यातील नॉन-टेक्निकल मुलांना नेमून, दुसऱ्या तालुक्यांमध्ये पंचनामे करायला पाठवले. त्या शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जातात, पैसे दिलेल्यांनाच विमा भरपाई मिळते, अशी माहिती समोर आली. त्यामुळे विमा कंपनीचा बोगस कारभार चव्हाट्यावर आला आहे. विमा कंपनीच्या कारभाराची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश लवकरच देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे संगणयत आले आहे.

दिनांक 25 मार्च 2025 रोजी हदगाव तहसील कार्यालयासमोर प्रल्हाद सूर्यवंशी, शिवाजी वानखेडे, संदीप सूर्यवंशी, लक्ष्मण शिंदे व पंडितराव चव्हाण या शेतकऱ्यांनी या अन्यायकारक कारभाराविरोधात उपोषण केले होते. त्यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतकऱ्यांशी थेट फोनवरून मंत्री महोदयांना संपर्क करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार हि बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी मागणी देखील आमदार कोहळीकर यांनी केली.
