लेंडी प्रकल्पस्थळी मेधा पाटकर यांची जनसंवाद सभा
नांदेड। मागील ३८ वर्षापासून रखडलेल्या लेंडी आंततरराज्य संयुक्त प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा ऐकुण घेण्यासाठी, शासन व लाभार्थी शेतकरी, प्रकल्पग्रस्तामध्ये सुसंवाद करण्याच्या दृष्टीने जेष्ठ समाजसेविका मा. श्रीमती मेधा पाटकर या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लेंडी प्रकल्पस्थळी दि.२१ डिसेंबर रोजी जाहिर जन संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व प्रकल्पग्रस्तानी, शेतकरी व जनतेनी सभेस उपस्थित राहावे असे अवाहान मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले आहे.
मागील ३८ वर्षापासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाचे काम सुरु व्हावे व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाने मान्य करावे. २०१३ च्या कायद्यानुसार २३३१ हेक्टर जमीनीस अनुदान द्यावे किंवा हेक्टरी ३० लक्ष रुपये पॅकेज घोषित करावे. अरुणावती ता. दिग्रस जि. यवतमाळच्या धरतीवर अकरा गावातील प्रस्तावित पुर्नवसन पूर्ण करावे. प्रकल्पग्रस्त बुडीत क्षेत्रातील बेरोजगारांना किमान १० लाख रु. अनुदान द्यावे व इतर मागण्या मंजुर करावे यासाठी मागिल अनेक वर्षापासून आंदोलन चालु आहे.
धरणग्रस्ताच्या मागण्या मान्य करावे व नंतरच प्रकल्पाचे काम सुरु करावे अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली आहे. सदर धरणाच्या महाराष्ट्र व आंध्रप्रदेशातील शेतकरी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी धरणाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. १९८६ साली ५४ कोटी खर्चाचा प्रकल्प आज २५०० कोटीच्यावर गेला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व लाभार्थी शेतकरी यांना न्याय मिळवुण देण्यासाठी जेष्ठ समाज सेविका मा. मेधा पाटकर दि.२१ डिसेंबर रोजी नांदेड येथे येत आहेत.
सकाळी मा. जिल्हाधिकारी यांचे सोबत बैठक व चर्चा, दुपारी १२.३० वा. शासकिय विश्रामगृह देगलूर येथे लाभार्थी व शेतकरी यांचेशी चर्चा व उपोषण कर्त्यांची भेट व दुपारी २.०० वाजता गोणेगाव प्रकल्पस्थळी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी, जनतेनी उपस्थित राहावे असे अवाहान मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, संभाजी शिंदे, अशोक सिद्धेवाड, भाऊ मोरे, लेंडी संघर्ष संमितेचे गुणवंतराव पा. हंगीरगेकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राजु पाटील रावणगावकर, म.ज.वि.प.चे डॉ.प्रा. गंगाधर इंगोले, अविनाश देसाई हासनाळकर, उत्तमराव भांजे, डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ.बालाजी कोंपलवार व संयोजक, कैलास येसगे कावळगावकर यांनी केले आहे.