किनवट| राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची ता.11 एप्रिल व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ता.14 एप्रिल रोजी संयुक्त जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरी होत असून या निमित्ताने जयंती समितीची कार्यकारीणी गठीत करण्यासाठी सिध्दार्थनगर येथील जेतवन बुध्दविहार येथे दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सायं.7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विचार विमर्ष केल्यानंतर सर्वानुमते जयंतीच्या अध्यक्षपदी गौतम पाटील यांची तर सचिवपदी प्रशिक मुनेश्वर यांची निवड करण्यात आली.
निवड करण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष -गौतम पाटील, उपाध्यक्ष-निखिल दि.कावळे/योगेश भवरे, सचिव-प्रशिक मुनेश्वर, सहसचिव – आकाश सर्पे/ संघर्ष घुले, कोषाध्यक्ष -सूरज भरणे/आकाश आळणे, सहकोषाध्यक्ष -स्वप्नील सर्पे/ निवेदक कानिंदे, संयोजक- सुरेश कावळे. संघटक पदी शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, सचिन कावळे, सुगत भरणे, रुपेश भवरे, राजू कावळे, प्रतिक नगराळे, पंकज नगारे व प्रसिध्दी प्रमुख म्हणून रवि कांबळे, राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड.मिलिंद सर्पे हे होते. जयंती समितीसाठी मार्गदर्शक म्हणून दादाराव कयापाक, विनोद भरणे, माधव कावळे, रविकांत सर्पे, प्रकाश पाटील, अॅड.किशोर मुनेश्वर, सुरेश जाधव, शंकर नगराळे, चंद्रहार मुनेश्वर, विवेक ओंकार, मारोती मुनेश्वर, उध्दव भवरे, गंगाधर मुनेश्,वर मधुकर पाटील, ज्ञानेश्वर मुनेश्वर, किशन परेकार, नितीन कावळे, गौतम नगराळे, राजू भरणे, रमेश मुनेश्वर, उत्तम कानिंदे, अनात्मा कयापाक, राजू सर्पे, शिलरत्न पाटील हे राहणार आहेत.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण या वर्षी जयंती निमित्त विशेष भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे जयंती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौतम पाटील व सचिव प्रशिक मुनेश्वर यांनी सांगीतले.