हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उ. मा. विदयालयाचा मार्च/एप्रिल 2024 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा एकुण निकाल 96.03 टक्के लागला आहे. विदयालयातून गुणानुक्रमे येणा-या विदयार्थीनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
मार्च/एप्रिल 2024 मध्ये दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या निकालात हुजपा कन्या शाळेतून प्रथम व तालुक्यातून प्रथम क्रमांक कु वैभवी माधवराव जाधव हिने (96.80%) गुण घेऊन मिळविला आहे. तर व्दितीय क्रमांक कु संस्कृती संतोष जंगम (95.80%) तर तृतीय क्रमांक कु. दिपाली विजय आरेपल्लू (95.60%) हिने मिळविला आहे. तर 90% वरील गुण घेणाऱ्या विद्यार्थिनी मध्ये कु. अनादी गजानन झरकर (94.80%), कु. मानसी गजानन सूर्यवंशी (94.80%), कु. अस्मिता सोमाजी कांबळे (94.80%), कु. श्रुती शिवकुमार अनंतुलवाड (94.60%), कु. ऋतुजा संजय आडे (94.40%), कु. अनुष्का हनुमंत चितावार (94.20%), कु. श्रुती पिराजी बासेवाड (92.80%), कु. प्रगती दादाराव बुध्देवाड (92.60%), कु. रूपाली दिलीप आरेपल्लू (92.60%), कु सृष्टी सदानंद देवसरकर (92.40%), कु. सिध्दी गजानन कदम (91.00%), कु. प्रणाली राजू डोंगरगावकर (90.60%), कु. मोनिका गणपत नाचारे (90.00%) गुण मिळविले.
तसेच परीक्षा दिलेल्या एकुण परीक्षार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य प्राप्त एकुण 51 विदयार्थीनी प्रथम श्रेणीमध्ये 69, व्दितीय श्रेणीत 56 तृतीय श्रेणीत 18 विदयार्थीनी उतीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा मा. सूर्यकांताताई पाटील (माजी केंद्रिय राज्यमंत्री, भारत सरकार), श्री अरुणजी कुलकर्णी सर (सचिव, मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर) व सर्व संचालक मंडळ तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक श्री रणखांब सर यांनी केले आहे.