
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील हदगाव ते अंबाळा शिव पांदण रस्त्यावर अनेक बड्या व्यक्तींनी अतिक्रमण करून हा पांदण रस्ता गीळकृत केला आहे याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या महिलांनी महिला अनेक वर्षापासून लढा देत आहेत पण प्रशासन केवळ राजकीय दबाव पोटी लक्ष देत नाही हे दिसून आल्याने शेवटी महिलांनी शेवटचा पर्याय म्हणून उपविभागीय कार्यालय हदगाव यांच्या समोर २५ जानेवारी २०२४ पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की मौजे अंबाळा ते हदगाव शहरात हदगाव शिव पादन रस्ता शासकीय नकाशावर आहे मात्र त्या पांदन रस्त्यावर अनेक बड्या व्यक्तींनी व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे व पक्के बांधकाम केले आहे. यामुळे तिथे ये जा करण्यासाठी नागरिकांना व शेतकऱ्यांना ना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना फार अडचणी निर्माण होत आहेत अशा आशा चे पत्र दिनांक 20 मे 2022 ला दिलेले होते. त्यानंतर संबंधित विभागाशी याबाबत अनेक वेळापत्रक करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही हे उल्लेखनीय आहे.
या निवेदनावर सीमा लोहारळर सविता बेतके लक्ष्मी वाघमारे व अश्विनी सोनुले हरप्रीत कौर पुजारी मौजे अंबाळा ते हदगाव हा शासकीय पांदण रस्ता खुला न झाल्यामुळे उपविभागीय कार्यालय हातगाव समोर दिनांक 25 जानेवारी 2024 पासून उपोषणा बसलेल्या आहेत. मात्र तिथे महिला करिता कोणताही पोलीस बंदोबस्त दिसून आलेले आलेला नाही विशेष म्हणजे हदगाव उपविभागीय अधिकारी पण महिला आहेत हे उल्लेखनीय आहे.
