
हिमायतनगर। शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या समोर असलेल्या शादी खान्यासमोर लावलेली क्रुझर जिपगाडी चारचाकी वाहण अज्ञातांनी पेटवली. या घटनेत क्रुझर जीप गाडी जळून खाक झाली आहे. हि घटना ता. ५ रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय विश्राम गृहासमोर असलेल्या शादीखाना येथे लग्नसमारंभ कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी मंडळीस घेवून क्रुझर गाडी चारचाकी वाहण येथे आले होते. तिथे काहीजण उपस्थित होवून आमच्या जनावरांची माहीती का? देतोस म्हणून फिर्यादीस दम भरत होते. आमची झालेली नुकसान भरपाई दे नाहितर तुझी गाडी जाळून टाकतो म्हणून गाडी पेटवून देतो असे म्हणत गाडीला आग लावली या घटनेत क्रुझर गाडी जळून खाक झाली आहे.
या संदर्भात फिर्यादी संजय मारोती बोलेवार वय ३२ वर्ष रा. विरसणी ता. हिमायतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुरन. ९९/२०२४ कलम १४३, १४९,४३५,४२७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, ए. एस. आय. श्रीमती कोमल कागणे हे करीत आहेत.
