नांदेड| मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देवुन ओबिसीत समावेश करावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला दोन वेळा बसले होते तीन टप्प्यांत महाराष्ट्र दौराही झाला त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यातील दौर्यात नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन महाराष्ट्रातील मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून झगडत आहे सरकारने काही तज्ञ जाणकारांनी सागुन देखील वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाला फसवले आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी जे उपोषण आंतरगाव सराटी येथे चालु केले होते ते कायद्याला धरुन आधी मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करा या पद्धतीचे आहे त्यामुळे समाजातील युवकांना कुठेतरी आता आपल्याला आरक्षण मिळेल असे वाटत आहे. परंतु सरकारने जरांगे पाटील यांना चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ मागितला आहे.मराठा आरक्षणाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असतांना सरकार या प्रश्नावर योग्य तोडगा काढेल की नाही याची शास्वती मराठा समाजाला दिसत नाही अशी समाजबांधवामध्ये चर्चा आहे.
मराठा समाज बांधवानी अतिशय शांततेत व संयमाने आपली भुमिका शासन दरबारी मांडलेली आहे याआधीच्या सरकारने वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाची प्रचंड निराशा केली आहे तसेच आताही होवु नये म्हणुन समाजातील अभ्यासु कार्यकर्त्यांसह समाजबांधव सरकारच्या प्रत्येक बाबींकडे बारकाईने लक्ष देत आहेत.मराठा आरक्षण या विषयाचे प्रबोधन व्हावे, पुढील आंदोलनाची दिशा समाजबांधवांना सांगण्यासाठी चौथ्या टप्प्यातील दौर्यामध्ये नांदेड जिल्ह्यात दिनांक सहा डिसेंबर माहुर येथे बळिराजा चौक लांची बायपास रोड येथे दुपारी बारा वाजता भव्य जाहीर सत्कार समाजबांधवाच्या वतीने करण्यात येणार आहे.
दिनांक सात डिसेंबर रोजी बारड येथे नांदेड ते भोकर रोडवर दरक पेट्रोलपंपासमोरील शेतात तसेच दिनांक आठ डिसेंबर रोजी जिजाऊ नगर मुसलमानवाडी पाटी येथे मातोश्री काॅलेजच्या मागे कल्हाळ रोडवरील शेतात सकाळी दहा वाजता
मारतळा येथे नांदेड ते हैद्राबाद रोडवरील शेतात दुपारी एक वाजता नायगाव येथे हनुमान मंदीराच्या मागे बैलबाजार मैदानात दुपारी तीन वाजता कंधार येथे शिवाजी हायस्कूलच्या मैदानात पानभोसी रोडवर रात्री सात वाजता सभा होणार आहेत.सभेच्या परिसरातील आजुबाजुच्या गावात जाऊन मराठा कार्यकर्त्यांनी सभेची माहीती देण्याचे काम युद्ध पातळीवर चालु आहे.प्रत्येक सभेच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार्कींगची व्यवस्था केलेली आहे.
सभा सुरु होण्याच्या पुर्वी आलेल्या समाबांधवांच्या प्रबोधनासाठी शाहीरांचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आला आहे.पोलिस प्रशासनासोबत हजारो स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहेत.प्रशासनामार्फत तसेच स्वयंस्फूर्तीने आरोग्य काळजीसाठी डाॅक्टर, ॲम्ब्युलन्स, नर्सेस,मेडिसीनची व यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे प्रत्येक सभेच्या ठिकाणी गावागवातुन समाजबांधव स्वतः हुन निधी देत आहेत.प्रत्येक सभेची सुरूवात जिजाऊ वंदनेने तर समारोप हा राष्ट्रगिताने होणार आहे या सभेच्या वेळी काही विघ्नसंतुष्ट लोक अफवा पसरवु् शकतात तरी समाजबांधवानी कोणत्याही अफवांना बळी पडुनये.सर्व सभांची तयारी जोरदार चालु आहे तसेच लाखोंच्या संखेने समाजबांधवानी मराठा ओबिसीकरण मनोज जरांगे पाटील यांच्या मनोगतातुन समजून घेण्यासाठी यावे असे आवाहन सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.