हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा फुले यांची पुण्यतिथी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीकारी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून समाजशास्त्र विभागाचे प्रमुख व स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम हे लाभले होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तद्नंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर तसेच त्यांच्या शैक्षणिक क्रांतीवर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वसंत कदम, डॉ. श्याम इंगळे, डॉ . पवार एल. एस., डॉ. दिलीप माने, प्रा. प्रविण सावंत, प्रा. एम . पी गुंडाळे, डॉ. डी. सी. देशमुख, डॉ. शेख शहेनाज, डॉ. सविता बोंढारे, डॉ. डी. के. मगर, डॉ . गजानन दगडे, डॉ. संघपाल इंगळे, डॉ . सय्यद जलील, डॉ. के. बी. पाटील, प्रा. आशिष दिवडे, प्रा. महेश वाखरडकर, प्रा. मुकेश यादव, प्रा. राजू बोंबले, प्रा . शेरेकर, तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री संदीप हारसूलकर, श्री लक्ष्मण कोलेवाड, श्री साहेबराव आसळकर, श्री विश्राम देशपांडे, श्री राजू डोंगरगावकर, श्री बालाजी चंदापुरे, श्री सचिन कदम, श्री प्रभू पोराजवार, श्री राहुल भरणे, व नगारे ताई, मस्के ताई आदीसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.