धर्म-अध्यात्मनांदेड

वाढोण्याच्या मंदिरात महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव; छबिना व हलगीच्या भव्य मिरवणुकीने होणार साजरा

हिमायतनगर,परमेश्वर काळे| शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या महाकाली मंदिरात महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव दिनांक 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्शवभूमीवर परिसरातील सर्व भाविक भक्त, पोतराज यांची उपस्थिती लाभणार असून, दुपारी 03 वाजता हलगीच्या तालावर शहरातील मुख्य रस्त्याने छबिना पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव मिती मार्गशीष शुद्ध 06 शके 1945 चंपाषष्टी दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 10.30 श्री साईनाथ बडवे महाराज यांच्या शुभहस्ते श्री महाकाली मातेचे अभिषेक, गादी, झेंडा व लाड जागेचे पूजन होणार आहे. दुपारी 03 वाजता बंडू देवकर, बाळू देवकर यांच्या हस्ते गादी व छबिना पूजन केल्यानंतर मातेची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून हलगीच्या तालात काढण्यात येईल. सदर मिरवणूक हि मोठा मारुती मंदिर बाजार लाईन, पोचंमा देवी मंदिर, बारतोंडी देवी मंदिर, तुका देवी मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, संतोषी माता मंदिर, लकडोबा मंदिर, आडेला देवी मंदिर, परमेश्वर मंदिर, पवनसुत हनुमान मंदिर, कालिंका मंदिरातून श्री महाकाली मंदिरात परत येईल.

या मिरवणुकीत पोतराज मंडळींसह महिला मंडळींनी सहभाग घेऊन हलगीच्या तालावर नृत्य सादर केले जाणार आहे. मिरवणूक परत येताच 05वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ९.३०  वाजता गणपत गुरुजीची आरती त्यानंतर पापय्या महाराज पोतराज यांचा जागर होणार आहे. त्यानंतर उत्तर रात्री लाडचा कार्यक्रम व सकाळी ७.०० वाजता कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमास संस्थापक गुरुपरंपरा प्रेरित गुरू महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवर्य शिवाजी महाराज शिंदे चालगणी तालुका उमरखेड, गुरु दिगंबर महाराज ईठेवाड पार्डी तालुका मूधोळ, यांचे शिष्य निळकंठ बालाजी गायकवाड (देवकर) उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमास देवकर, पोतराज मंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक संजय परमेश्वर मादसवार यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला मानकरी म्हणून दत्तराव वानखेडे, नथुराव वानखेडे, प्रकाश वानखेडे, माणिकराव वानखेडे, उत्तम वानखेडे, प्रभाकर वानखेडे, दगडू पाटील, माधवराव डोंगरे, दिलीप कदम, बाबाराव पवार, दादाराव बर्वे, चांदराव विनकरे, भगवान थोटे, मारुतीराव वंजारे, गुलाबराव वंजारे, संतोष माने, परमेश्वर मानकरी, जिजाबाई वाटोरे कोपरा, दिगंबर तासके सिंदगी, रामू कोथळकर, भागवत पवार, तुका वानखेडे, शुभम वानखेडे, रवी टोमके, संतोष माने, ज्ञानेश्वर कदम, सतीश देवकर, नागेश गाजुलवार, गोविंद पवार, संजय कदम, दीपक कोले, पांडुरंग पवार, दत्ता कदम, चांदा वंजारे समस्त चालगणीकर उपस्थित राहतील.

तसेच कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शांतीलाल श्रीश्रीमाळ, रामभाऊ ठाकरे, किरण बीचेवार, आशिष सकवान, डॉ.अशोक उमरेकर, डॉ.राजेंद्र वानखेडे, डॉ. विकास वानखेडे, विठ्ठल ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे, सावण डाके, संतोष साबळकर, विलास वानखेडे रामभाऊ सूर्यवंशी, संजय माने, लक्ष्मीकांत देशपांडे, परमेश्वर उठलवार, गंगाराम मिस्त्री, आशुतोष बोरेवाड, मारुती गवळे, देवय्या सेठ, संदीप अग्रवाल, बालाजी पोपुलवार, गजानन मुतलवाड, योगेश चिल्कावार, सचिन नरवाडे, सुरेश जाधव, परमेश्वर, सरदार खान, आनंद गायकवाड, परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, प्रकाश जैन, सोपान बोम्पीलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, अनिल भोरे, मनोज पाटील, दिलीप शिंदे,नागेश शिंदे, अभिषेक भक्केवाड, आदींसह अनेकांची उपस्थिती लाभणार आहे. सदरील कार्यक्रमाचे व्यवस्थापक शुभम दंडेवाड शिवतेज मित्र मंडळ करणार असून त्यांच्यासोबत गजानन चायल, विपुल दंडेवाड, मारुती डांगे, कल्याण सिंह ठाकुर, शितल सेवनकर, दुर्गेश मंडोजवार, राजकुमार जयस्वाल, आकाश वानखेडे, मंगेश शिंदे, सुधाकर चित्तेवार, हानुमान अरेपल्लू आदींसह अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.

यावेळी पापय्या पोतराज, आनंद पोतराज, शामराव पोतराज, बाबुराव पोतराज, येल्लारेड्डी पोतराज, मुद्गुल पोतराज, दत्ता महाराज करंजी, श्यामराव बनसोडे, संत देव माय, सौ. सखुबाई पोचिराम बनसोडे, लक्ष्‍मीबाई गंगाधर गड्डमवार, सौ. मिनाबाई मंडोजवार, अनुसया बनसोडे, अनुसयाबाई मिरे, मायाबाई वाघमारे, अरुणबाई रामदीनवार, जयश्रीबाई अलकटवार, इंदुबाई खंदारे, गोदावरी बिजोरे, भागीरथाबाई करंजीकर, वनिताबाई सोळंके, कलावतीबाई गिरी, प्रयागबाई आचेमवाड, आडेलाबाई जानगेवाड, अनुसयाबाई जानगेवाड, मनीषा सोळंके, मोहन भारती, संतोष गायकवाड, मारोती अहिरवाड, बाळू नागनाथ, प्रसाद सातलवाड, बंटी देवकर, गोपी भरती, ईश्वर देवकर, जनाबाई, परमेश्वर नरहरे, गणेश इरेवाड, लताबाई मुलंगे, लताबाई पाध्ये, लताबाई ऋघे, मथुराबाई भोयर, ज्योतीताई पार्डीकर, ज्योतीताई बेदरकर, सविताताई हरडपकर, गंगाबाई चाटलेवार, कांताबाई बनसोडे, धोंड्याबाई शिंदे, कमलबाई जाधव, यशदाबाई अहिरवाड, मोनिकातै जयस्वाल, अमोल भडंगे, बाळू राऊत, मालय्या स्वामी, पापय्या महाराज, आदी पोतराज व गावकरी मंडळी उपस्थित राहणार आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!