
श्रीक्षेत्र माळेगाव मीडिया सेंटर| जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे पशु व अश्व स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. लाल कंधारी वळू मध्ये सुनेगाव तालुका लोहा येथील पशुपालक अजय विश्वनाथ जाधव यांचा वळू माळेगाव चॅम्पियन तर नेत्रगाव तालुका उदगीर येथील पशुपालक नजीर रज्जाक पटेल यांची देवणी गाय माळेगाव चॅम्पियन ठरली आहे.
अश्वगट नर व मादी गटात – तेजपालसिंग श्रीपालसिंग शाहू यांचा अश्व प्रथम आला आहे. व्दितीय अवधूत मारुती कदम तर इंद्रजीत वडपुरकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. लाल कंधारी गटात अदात वाळू गटात प्रथम श्रीपत देवराव शिंदे, मांजरम तालुका नायगाव, व्दितीय विठ्ठल किशन देवकते, हसुळ तालुका कंधार तर तिसरा संतोष माधव सापनट, लिंबोटी तालुका लोहा. गाय गटात – प्रथम सुरेश गोविंदराव कांगणे, बोरी ता कंधार, व्दितीय संतोष माधव सापनट, लिंबोटी ता. लोहा, तृतीय क्रमांक परसराम नागनाथ सापनट, लिंबोटी ता.लोहा यांनी पटकावला. दोन दात गटात प्रथम अजय विश्वनाथ जाधव, सुनेगाव तालुका लोहा, व्दितीय विठ्ठल बालाजी पांडुरंगे, बाचोटी तालुका कंधार, तृतीय दयानंद मारोतराव कदम, कारतळा तालुका कंधार
कालवड गटात – प्रथम कमलाबाई बाबुराव गीते, लिंबोटी तालुका लोहा, व्दितीय श्रीहरी संभा ढवळे, नागलगाव तालुका कंधार, तृतीय देविदास उद्धव सापनर, लिंबोटी तालुका लोहा, देवणी गाय अदात वळू गटात – प्रथम नारायण तुळशीराम गरुडे, जिगळी तालुका उदगीर, व्दितीय सौ. सत्यभामा केरबा शिंदे, तळणी तालुका रेनापुर, तर तृतीय ज्ञानोबा सिद्राम सरोदे, हासेगाव तालुका औसा, चार व सहा दात गट- प्रथम अरमान पटेल, नेत्रगाव तालुका उदगीर, व्दितीय विश्वनाथ हनुमंतराव जाधव, सुनेगाव तालुका लोहा, तृतीय शिवाजी सोपान देवगड केंद्रे, तालुका गंगाखेड, मादी वासरे गट प्रथम भागवत कडप्पा जाधव, असेगाव तालुका लोहा, व्दितीय सुभाष गोविंदराव कवटे, आसेगाव तालुका लोहा, तृतीय दशरथ भुजंगा पवार कुणकी, ता. जळकोट, गाय गटात – प्रथम बालाजी मालिका जाधव, असेगाव तालुका लोहा, तृतीय सोनेराव श्रीपती लव्हेर, आसेगाव तृतीय बालाजी मारुती केंद्रे, कुणकी तालुका जळकोट
अश्व गट निकाल – पशुप्रदर्शनात अश्व स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये दोन दात गटांमध्ये प्रथम हरविंदरसिंग शिलेदार, द्वितीय अर्जुन नंदकिशोर अकटवर, तृतीय अजय चंद्रकांत देशपांडे, चार दात व चार दातावरील अश्वगटात प्रथम मधुरकर वशप्रीतसिंग, द्वितीय नारायण नरहरी पावडे, तृतीय भगवान रामचंद्र पाटील , शेळी गटात – प्रथम नवनाथ सापनकर, लिंबोटी ता. लोहा, व्दितीय प्रकाश लक्ष्मण कांबळे नेत्रगाव तालुका उदगीर, तृतीय बालाजी तुकाराम नरवटे, धर्मनगरी तालुका गंगाखेड, कुक्कुट असीत गटात प्रथम महेश बालाजी कदम, पुयडवाडी तालुका नांदेड, हनुमंत बाबुराव मुंडे, डोंगर शेळकी तालुका उदगीर, तृतीय लक्ष्मण सखाराम राठोड दत्त मंदिर गंगाखेड, देशी गटात प्रथम संग्राम गणपती तिडके, बोरी खु तालुका कंधार, दुतीय अरविंद बालाजी चव्हाण, फुटतलाव तांडा तालुका पालम, सर द्वितीय क्रमांक गरिमा ऍग्रो फार्म उदगीर यांनी पटकावला आहे. या स्पर्धेसाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
