छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात सोमवारी दारु दुकाने बंद
नांदेड| जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सोमवार 19 फेब्रुवारी रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोमवार 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल, बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.