तेलंगणा बॉर्डावरील वाशी परिसरात शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला; शेतकरी जखमी; वानविभाची टीम तैनात
हिमायतनगर,अनिल मादसवार। तेलंगाना महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील वाशी परिसरात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याचे घटना दिनांक 20 रोजी सकाळी घडली आहे या घटनेनंतर वन विभाग अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून या घटनेची तपासणी केली जात असून बिबट्याचा वावर आजचा कोण्या भागाकडे आहे हे सांगणे कठीण असले तरी नागरिकांनी सुरक्षेच्या हेतूने स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
गेल्या महिन्याभरापासून उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे त्यामुळे पाण्याच्या शोधात बिबट्या व अन्य मान्य प्राणी गाव वस्तीकडे धाव घेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाशी, पवना, टाकराळा, दरेसरसम, भिष्याची वाडी, वाळकेवाडी, ताडाची वाडी, एकघरी, दगडवाडी, हा भाग जंगलाच्या काठावर आहे. जंगलात हरीण, मोर, लांडगे, रोही, यासह अनेक हिंस्र प्राणी आहेत. गेल्या काही महिण्यापासून या जंगल भागात बिबट्यांचा वावर सुरू आहे. तेलंगणातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या अनेकांनी अंदाजे 500 मीटर दुरून तीन ते चार वाघाच्या कळपास जाताना पाहिले होते. तेव्हापासून या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू आहे मागील काही दिवस तर पाण्याच्या शोधात एक बिबट्या वाशीकर यांच्या शेतातील विहिरी जवळ बसला होता त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी शेताकडे ये जा करणे टाळले होते मात्र हा व्यक्ती पुन्हा दुसरीकडे निघून गेल्याने शेती कामांना पुन्हा शेतकऱ्यांनी सुरुवात केली.
दरम्यान दि. २० एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शेतकरी दुलाजी देवजी देशमुख वय ४८ वर्षे हे आपल्या शेतात पेरणीपूर्वी मशागतीची कामे करण्यासाठी शेतीत गेले होते, दरम्यान 10 वाजेच्या सुमारास शेतातील ज्वारीला पाणी देत असताना बाजुला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला, आणि शेतकऱ्यांस जखमी केले.यात शेतकऱ्यांच्या पायाच्या टाचेला चावा घेतल्याने ते रक्तबंबाळ झाले. यावेळी शेतकऱ्यांन आरडा ओरडा व धाडस करून बिबट्याच्या तावडीतून कशी बशी सुटका करून घेऊन गाव गाठून घटनेची माहिती दिली.
वनरक्षकास याची माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने वनपाल,वनरक्षक,वनमजुर यांनी चिंचोर्डी येथील प्राथमिक उपचार पुढील उपचारासाठी नांदेडला हळवीण्यात आले आहे. त्याची प्रकृती चांगली असली तरी जंगलाच्या भागात फिरत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिक, शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे. या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांस तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर होत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने या परिसरात काही कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली होती. त्यामुळे काल झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकऱ्यास वाचविण्यासाठी वनविभागाला यश आले असले तरी बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिक व या रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा देण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असेही सांगितले आहे. तसेच बिबट्याच्या शोधत आमची टीम दाखल झाली असून, लवकरच बिबट्याचा शोध लाऊन बंदोबस्त केला जाईल, आणि जखमी झालेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत मिळून देणार असल्याचे म्हणाले.