श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | माहूर शहरातील पौराणिक भोजंता तलावा शेजारी असलेल्या पुरातन भगवान शिव शंकराच्या मंदिरा च्या पायथ्याशी पावसामुळे एक दगड वर आलेले काही नागरिकांना दिसले असता त्यांनी तेथे कुतूहलापोटी खोदकाम केले. त्या खोदकामात चतुर्थ मुखी पौराणिक गणेश मूर्ती दिसल्याने नागरिकांनी या मूर्तीची शिव मंदिराच्या ओट्यावर प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केल्याने या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

माहूर शहर हे पौराणिक ऐतिहासिक शहर असल्याने येथे कुठेही खोदकाम केले असता पुरातन वस्तू सापडतात. येथे अनेक ठिकाण पौराणिक तर किल्ल्यासह इतर वास्तू ऐतिहासिक असल्याने पर्यटक आकर्षित होत आहेत. शहरातील शेवटचे टोक म्हणून श्री देव देवेश्वर संस्थांनच्या मालकीच्या असलेल्या चक्रधर स्वामी यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या भोजंता तलावा च्या शेजारी माहूर शहराच्या शिवे अंतर्गत असलेल्या 12 शिव मंदिरापैकी एक पौराणिक शिव मंदिर आहे.

या मंदिरात दररोज नागरिक नित्यनेमाने पूजाअर्चा करतात येथे दर्शनासाठी आलेले नागरिक झाडाखाली विसावाही घेतात वयोवृद्ध भाविक प्रदक्षिणा करत असतात यावर्षीच्या पावसामुळे शिव मंदिराच्या ओट्याखाली असलेल्या जागेत एका दगड वर आलेले दिसले त्यामुळे काही नागरिकांनी कुतूहलापोटी येथे खोदकाम करून बघितले असता त्यांना चतुरमुखी गणेश मूर्ती आढळून आली.

चतुर्थी गणेशाची मूर्ती सापडल्याची वार्ता शहरात पसरतात हजारो भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सादर ठिकाणची पाहणी करून येथील सुरक्षा वाढविली आहे. तर सदरील शिवमंदिरावर छत नसल्याने उघडेच आहे त्यामुळे भाविकांनी येथे तात्काळ मंदिराची उभारणी साठी संकल्प करून पुरातन विभागाच्या परवानगीने कामास सुरुवात होणार आहे.
