कतरिना कैफ बनली ‘रॅडो’ची ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

मुंबई| रॅडो या कालातीत डिझाइन्‍स निर्मितीकरिता नाविन्‍यपूर्ण साहित्‍याचा उपयोग करण्‍यासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या प्रतिष्ठित स्विस वॉचमेकर कंपनीला त्‍यांची ग्‍लोबल ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून बॉलिवुड सुपरस्‍टार क‍तरिना कैफ यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा करताना आनंद होत आहे. हा उत्‍साहवर्धक सहयोग आजीवन टिकणाऱ्या आठवणी निर्माण करण्‍याप्रती रॅडोच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.

कतरिना कैफ यांची मोहक सुंदरता आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील ख्‍याती त्‍यांना रॅडोची अचूकता, नाविन्‍यता व कलाकृतीप्रती अविरत कटिबद्धता सादर करण्‍यासाठी परिपूर्ण निवड बनवतात. वैविध्‍यपूर्ण टॅलेंट व करिष्‍मासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या कतरिना कैफ यांच्‍यामध्‍ये रॅडोकरिता लोकप्रिय असलेली मूल्‍ये सामावलेली आहेत.

रॅडोचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अॅड्रियन बोशार्ड म्‍हणाले, “आम्‍हाला रॅडो कुटुंबामध्‍ये कतरिना कैफ यांचे स्‍वागत करताना आनंद होत आहे. त्‍यांची मोहक सुंदरता व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रसिद्धी रॅडोच्‍या मुलभूत तत्त्वांशी संलग्‍न आहेत. आम्‍ही सहयोगाने लक्‍झरीला नव्‍या उंचीवर नेण्‍याच्‍या या प्रवासाप्रती उत्‍सुक आहोत.”

कतरिना कैफ या सहयोगाबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, “मला वॉचमेकिंगमधील सर्वोत्तमतेसाठी ओळखला जाणारा ब्रॅण्‍ड रॅडोसोबत सहयोग करण्‍याचा सन्‍मान वाटण्‍यासोबत आनंद होत आहे. रॅडो वॉचेसनी त्‍यांची नाविन्‍यपूर्ण डिझाइन्‍स व दर्जाप्रती कटिबद्धतेमुळे माझे लक्ष वेधून घेतले आहे. मी या प्रतिष्ठित स्विस ब्रॅण्‍डचे जागतिक व्‍यासपीठावर प्रतिनिधीत्‍व करण्‍यास उत्‍सुक आहे.”

रॅडोसाठी ग्‍लोबल ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर असलेल्‍या कतरिना कैफ ब्रॅण्‍डच्या नवीन मोहिमांमध्‍ये दिसल्‍या आहेत. रॅडोसोबतच्‍या त्‍यांच्‍या पहिल्‍या मोहिमेमधून अपवादात्‍मक टाइमपीसेस निर्माण करण्‍याप्रती ब्रॅण्‍डची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामध्‍ये दीर्घकालीन स्‍टाइलसह कालातीत साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!