नांदेड| बालविद्यामंदिर हायस्कूल परभणी येथे कै. म. शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धा 24 डिसेबंर संपन्न झाली, सदरील वक्तृत्व स्पर्धेत महात्मा फुले माध्यमिक शाळा, विजयनगर, नांदेडचा विद्यार्थी वेदांत सचिन टोंगळे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकवला.
त्याला स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व रोख सातशे रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी त्याला त्याचे वर्गशिक्षक तारू व पालकांचे मार्गदर्शन लाभले. वक्तृत्वाचा विषय होता ” संस्कारे घडतो माणूस “. त्याच्या या यशाबद्दल त्याचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक तसेच सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.