नांदेड/माहूर| प्रसिद्ध दर्गा,पर्यटकांना खुणावणारा धबधबा आणि पर्यटन स्थळ असलेल्या माहूर पासून बारा की.मी.वसलेल्या व डोंगर दरीत असलेल्या ऐतिहासिक वझरा येथे दि.१२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर असे चार दिवसीय कबड्डीच्या प्रेक्षनीय सामन्याचे आयोजन वझरा गांवकऱ्यांच्या वतीने आणि जय बजरंग क्रीडा मंडळ वझरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ५० आणि ५२ किलो वजन गटातील संघ या स्पर्धेत सामील झाले होते.
प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये,द्वितीय सात हजार,तृतीय पाच हजार तर चतुर्थ पारितोषिक तीन हजार रुपयाचे ठेवण्यात आले होते. प्रथम पारितोषिक सुदर्शनभाऊ राठोड,द्वितीय प्रल्हाद मोतीराम राठोड, तृतीय वझरा येथील सरपंच दिपक संभाजी केंद्रे तर चतुर्थ बक्षीस गजानन गोपीनाथ चव्हाण यांच्या वतीने देण्याचे घोषित केले होते. रात्रंदिवस चाललेल्या चार दिवसीय सामन्यात एकूण तेवीस संघांनी प्रवेश नोंदीवीला होता.त्यापैकी वझरा गावातील तीन संघ सहभागी होते. दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १:३० अंतिम सामना खेळला गेला. प्रथम विजेता संघ म्हणून शिवशक्ती क्रीडा मंडळ,कळंबा (महाली )ता.जि. वाशिम यांनी मान पटकावीला तर द्वितीय पारितोषिक जय सेवालाल क्रीडा मंडळ मेट ता.माहूर येथील संघाने जिंकले.तृतीय पारितोषिक जय बजरंग क्रीडा मंडळ वझरा यांना मिळाले तर चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी रावण साम्राज्य कबड्डी संघ सांबरलोळी ता.किनवट हा संघ ठरला.
पंच म्हणून जुन्या काळातील नामांकित कबड्डी खेळाडू शिवराज कोंडीबा फड, lराजू आडे,कॉ.गंगाधर गायकवाड,गजानन घुगे, अरविंद पवार,सलीम शेख,माधव केंद्रे,सुखदेव रनमले,नागेश्वर आरके यांनी काम पाहिले. वाशिम संघाचे कर्णधार मोहन भाऊ जाधव,मेट संघाचे कर्णधार धीरज राठोड,वझरा संघाचे कर्णधार केरबा केंद्रे,सांबरलोळी संघाचे कर्णधार बजरंग मेश्राम यांनी पारितोषकांची रोख रक्कम आपल्या संघाच्या वतीने स्वीकारली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले असून कमिटीतील प्रमुख कार्यकर्ते बिरबल चव्हाण,आंनद केंद्रे, कृष्णा मुंडे, गजानन जाधव, रितेश मुंडे,रोहन मुंडे,गुरु मुंडे,अक्षय यानकुडके,ऋतिक चव्हाण, फेरोज शेख,रोशन चव्हाण,रोशन चांदेकर,अभिजीत मुंडे,गजानन शेंडे आदींचा समावेश होता.परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मौजे वझरा येथे कबड्डीच्या सामन्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.