नांदेड| दिनांक 12.11.2023 रोजी कौठा नांदेड भागातील ब्युटीपार्लर व्यावसायीक यांना वेगवेगळया तीन मोबाईल क्रमांकावरून कॉल करून रिदाचे नाव घेवून मैं रिंदा बोल रहा हु आज रात नऊ बजे तक रूपये पाच लाख रेडी रखना और पोलीस मे कम्प्लेंट दिया तो तेरी खैर नही तेरे औरे तेरे बच्चे के तुकडे कर दुंगा असे म्हणुन पाच लाख रूपयाची खंडणीची मागणी करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने पोस्टे नांदेड ग्रामीण येथे दिनांक 15.11.2023 रोजी गुरनं. 820 / 2023 कलम 387 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोउपनि / श्री बाबुराव चव्हाण पोस्टे नांदेड ग्रामीण यांनी केला. तपासा दरम्यान त्यांनी गुन्हयातील संशयीत आरोपी नामे 1) अमित अनिल सवामचन वय 21 वर्षे रा. वाल्मीक नगर, नांदेड 2 ) जसप्रितसिंग प्रतापसिंग मठाळू वय 20 वर्षे रा. गुरुव्दारा गेट नं. 1 नांदेड यांना ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने चौकशी केली आम्ही दोघांनी मिळून पैशाचे लोभापोटी फिर्यादीस वेगवेगळ्या मोबाईल वरून पैशाची मागणी केली होती. असे प्राथमिक तपासात सांगत आहेत.
सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, नांदेड, मा. श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, मा. श्री. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री श्रीधर जगताप सपोनि श्री बाबुराव चव्हाण, पोउपनि, पोस्टे नांदेड ग्रामीण, पोहेकॉ / ज्ञानोबा कौठेकर, पोकॉ / संतोष बेलुरोड, शेख सत्तार, स्वामी, अर्जुन मुंडे, शिवानंद कानगुले, पोस्टे नांदेड ग्रामीण, सायबर पोस्टेचे, पोउपनि / दळवी, पोहेकॉ / राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, मपोकों / पठाण यांनी कार्यवाही केली आहे.नांदेड जिल्हयातील नागरीकांना असे कोणतेही धमकीचे कॉल आल्यास पोलीसांशी संपर्क साधाण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी केले आहे.