जवान शरद ढगे अमर रहे,सिडको वासीयांनी दुतर्फा रोडवरून वाहिली श्रध्दांजली
नवीन नांदेड| इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस (२८ रेवाडी हरियाणा) बटालियन मध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले किवळा ता. लोहा येथील शरद विनायक ढगे यांच्ये २३ आक्टोबर रोजी मुत्यु झाल्यानंतर त्यांचा पाथीर्वदेह सिडको मार्ग किवळा येथे २४ आक्टोबर रोजी सायंकाळी वाहनाने जात असतांना ऊस्मानगर रोडवर दुतर्फा हजारो नागरीकांनी शहीद जवान शरद ढगे अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता कि जय, या घोषणांनी ऊभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
किवळा येथील शरद विनायक ढगे हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस २००४ मध्ये हवालदार या पदावर रुजू झाले होते, त्यांनी नवी दिल्ली, छत्तीसगढ, ऊतर व मध्य प्रदेश येथे १९ वर्ष सेवा बजावली , हरियाणातील रेवाडी येथे कार्यरत असतांना २३ आक्टोबर रोजी मृत्यू झाला, त्यांच्या पाथीर्वदेह विमानाचे नागपुर येथे आणल्या नंतर रूग्णवाहीका वाहनाने नांदेड सिडको ऊस्मानगर रोड मार्ग किवळा येथे जात असतांना सायंकाळी ७ वाजता सिडको येथुन जात असतांना ऊस्मानगर रोडवर दुतर्फा हजारो नागरीकांनी अमर रहे अमर रहे,जवान शरद ढगे अमर रहे, भारत माता कि जय घोषणा देऊन ऊभे राहुन श्रध्दांजली अर्पण केली.
हडको परिसरातील आयोजित कार्यक्रम प्रसंगी मान्यंवरासह उपस्थित जनसमुदाय व आयोजकांचा वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली,ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.