धर्म-अध्यात्मनांदेड
तीर्थ क्षेत्र निधीच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिराचा सर्वागीण विकास होतोय ही आनंदाची बाब – पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी
हिमायतनगर। येथील श्री परमेश्वर मंदिरात भाविकांसाठी अनेक सोयी, सुविधा चांगल्या प्रकारे मिळत आहेत. ही बाब गौरवास्पद असून, याही पेक्षा अधिक पट्टीने जसे की, मोठ मोठ्या देवस्थानात भाविकांसाठी सोयी उपलब्ध असतात. त्या धर्तीवर येथील श्री परमेश्वर मंदिराचा विकास अपेक्षित असून, सध्याला इथे तीर्थ क्षेत्रांच्या माध्यमातून परमेश्वर मंदिराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही बाब आनंदाची आणी तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. असे प्रतिपादन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी केले.
ते नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्वर मंदिराला दि.१२ मंगळवारी गोवर्धन बियाणी यांनी भेट दिली. प्रथमतः श्री परमेश्वर देवाचे दर्शन घेऊन, मंदिर परिसराची पाहणी त्यांनी केली. या प्रसंगी पुढे बोलतांना बियाणी म्हणाले की, तीर्थ क्षेत्रांच्या माध्यमातून आणखीन या मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः पालक मंत्र्याशी बोलून या मंदिरांच्या सर्वागीण विकासासाठी अधिक निधीची मागणी करूण या ठिकाणी आणखीन भाविकांसाठी सोयी, सुविधा मिळवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहे. असे ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी बोलताना गोवर्धन बियाणी म्हणाले. याप्रसंगी गोवर्धन बियाणी यांच्या हस्ते श्री परमेश्वर मंदिर मूर्तीच्या कैलेंडरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र संगणवार, उपसंपादक किरण कुलकर्णी, उपसंपादक प्रशांत गवळे, मंदिर समितीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक विलास वानखेडे, राजाराम झरेवाड, अनिल मादसवार, संजय माने, रामराव सूर्यवंशी, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, पत्रकार संघाचे जिल्हा संघटक प्रकाश जैन, डिजीटल मिडीयाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, गोविंद गोडसेलवार, धम्मपाल मुनेश्वर, शेख मुखीद खडकीकर, अभिषेक बकेवाड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.