नांदेड| तेलंगणा आणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात अग्नीशस्त्र वापरुन चैन स्नॅचिंग, घरफोडी, मोटार सायकल चोरी करणारी अंतरराज्यीय टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांनी केलेल्या १४ गुन्ह्याचा उलघडा करत सात आरोपीकडून एकुण 6,89,697/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या दबंग कार्यवाहीच्या गुन्हेगारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्हयातील गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक महेश कोरे व त्यांचे सहकार्यांनी दिनांक 07 जुलै 2025 रोजी पथकासह रवाना झाले. दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून रेव्हेन्युव्ह सिटी आसनापुल येथे छापा टाकला. येथील रोडवर गावठी कट्टे घेवुन आरोपी शेख मोबीन शेख गौस वय 25 वर्ष, रा.खुदबेनगर नांदेड, संजय ऊर्फ संजु दत्ता गुंडेवार वय 30 वर्ष, रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड, रोहीत नरेंद्र ताटीपामुलवार वय 21 वर्ष, रा. भावेश्वर नगर चौफाळा हे उभे असताना त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 03 गावठी कट्टे, 04 जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपीकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांचे काही मित्र शिवरोड, तरोडा, नांदेड येथे चोरीचा माल वअग्नीशस्त्र विक्री करण्यासाठी थांबलेले आहेत. त्या ठिकाणी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी छापा मारला असता तेथे अमन ऊर्फ आमन्या किशोर जोगदंड वय 21 वर्ष, रा. खोब्रागडेनगर, नांदेड, राहुल ऊर्फ हिपहाप मानिका लिंगायत वय 23 वर्ष, रा. जि.प.शाळेच्या मागे भोकर, मोहम्मद आफताब ऊर्फ अदु अब्दुल खदीर वय 21 वर्ष, रा. दिवानी बावडी, इतवारा ह. मु. मुदखेड याना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 01 गावठी कट्टा, 03 जिवंत काडतुस, 01 मंगझीन, 6.4 तोंळे सोन्याचे दागीने, 02 मोटार सायकली व नगदी 5,500/- असा मुद्देमाल मिळुन आला आहे.

तसेच यातील आरोपी अमन याचा मित्र व चोरीचा माल घेतलेला ईसम नामे राहुल ऊर्फ बब्या चंद्रकांत राव वय 25 वर्ष रा. आंबेडकर नगर, भोकर यास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन गुन्हयातील नगदी 10,000 /- रुपये व मुथुट फायनान्स येथे ठेवलेले सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. वरील सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन नांदेड जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणी चैन स्नॅचिंग, घरफोडी व मोटार सायकल चोरी केलेला मुद्देमाल तसेच 04 अग्णीशस्त्रे, 01 मॅगझीन व 07 जिवंत काडतुस असा एकुण 6,89,697 रू (सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे सत्यान्नव रूपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले.
